Exclusive News..?अनपेक्षित पण सर्वकष माहिती देणारी..!

0
IMG_4208
Spread the love

विशेष

आज बळीराजाची नजर पुन्हा एकदा आभाळाकडे लागली आहे. डोळ्यांत आस, ओठांवर कोरडेटाची धूळ आणि मनात भयानक प्रश्नांचं काहूर घेऊन तो आभाळाला विचारतोय – “या वर्षी पाऊस असा कसा रुसला?” आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना एकाच शब्दाचा पुनरुच्चार सर्वत्र होतोय – ‘अल निनो’..!स्वातंत्र्यापूर्वी असो वा स्वातंत्र्यानंतर, आपल्या देशानं एल निनोचे अनेक प्रहार सहन केले आहेत आणि त्याही परिस्थितीत आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या घामातून पिकवून देशजगाचा पोशिंदा म्हणून भूमिका पार पाडली आहे. पण हा एल निनो नक्की आहे तरी काय? तो कसा तयार होतो? आणि त्याचा आपल्या भूमीशी व जगाशी नेमका काय संबंध आहे? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..!

अल निनो’ हा स्पॅनिश भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘लहान मूल’ किंवा ‘ख्रिस्त बालक’ असा होतो. पेरू देशातील दक्षिण अमेरिका किनारपट्टीवरील ख्रिसमसच्या सुमारास समुद्राच्या पाण्याचे तापमान अचानक वाढायचे, तेथील स्थानिक मच्छिमारांनी याला हे नाव दिले होते. पुढे हा हवामानातील एका महाकाय चक्राचा भाग बनला, ज्याला ENSO – El Niño-Southern Oscillation म्हटले जाते.सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रशांत महासागरात विषुववृत्ताजवळ घडणारे हे एक नैसर्गिक फेरफार आहे. नेहमीच्या काळात पॅसिफिक महासागरातारे वारे पूर्वकडून पश्चिमेकडे – आशियाकडे वाहतात, ज्यामुळे समुद्राचे पाणी पृष्ठभागावर थंड राहते. परंतु एल निनोच्या काळात हे वारे मंदावतात किंवा उलटे वाहू लागतात. परिणामी, दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडील आणि पॅसिफिकमधील पाण्याचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढते. समुद्राच्या पृष्ठभागाचे हे तापमान वाढल्यामुळे संपूर्ण जगाचे हवामान चक्र कोलमडते.जगभरात आणि देशात एल निनो किती वेळा आला आहे?एल निनो हा दर ठराविक वर्षांनी नियमित येणारा पाहुणा नाही, तर तो अनियमितपणे दर २ ते ७ वर्षांच्या अंतराने आपले स्वरूप बदलत जगतो..!

जागतिक आकडेवारी काय सांगते तेही पाहूयात.ऐतिहासिक नोंदीनुसार, गेल्या दीड-दोन शतकांत जगभरात डझनभर तीव्र एल निनो अनुभवले गेले आहेत. विसाव्या आणि एकविसाव्या शतकात १९८२-८३, १९९७-९८, २०१५-१६ आणि अलीकडील काळात २०२३-२४ मधील एल निनो अत्यंत तीव्र स्वरूपाचे मानले गेले आहेत. प्रत्येक वेळी हा प्रकार जगभरात कुठेक्रे पूर, तर कुठे भीषण दुष्काळ घेऊन आला आहे..!

भारतात स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही एल निनोच्या सावटाखाली अनेकदा दुष्काळ किंवा कमी पावसाची नोंद झाली आहे. १९०५, १९११, १९१८, १९७२, २००२, २०१४ आणि २०२६ यांसारख्या वर्षांत एल निनोमुळे भारतीय मान्सून विस्कळीत झाला होता. विशेषतः १९१८ आणि १९७२ मधील एल निनोने भारताच्या कृषी क्षेत्राला मोठा धक्का दिला होता..!

अल निनो तयार होण्यामागे समुद्र आणि वातावरण यांच्यातील परस्पर आंतरक्रिया कारणीभूत असते.

१. वाऱ्यांची दिशा बदलणे- जेव्हा विषुववृत्तीय व्यापारी वारे कमजोर होतात, तेव्हा पश्चिमेकडे वाहणारे उष्ण पाणी पुन्हा पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेच्या किनाऱ्याकडे सरकू लागते.

२. वाढलेले तापमान- समुद्र पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त झाल्यामुळे हवेचा दाब बदलतो.

३. मान्सूनचे वारे लांब पळणे- भारतासारख्या देशात मान्सूनचे वारे हिंदी महासागरातून पाऊस घेऊन येतात. पण पॅसिफिक महासागरातील अति-उष्णतेमुळे भारतीय उपखंडातील मान्सूनचे वारे ओढले जातात किंवा त्यांची शक्ती कमी होते, परिणामी भारतात पाऊस कमी पडतो किंवा ओढ देतो..!

बळीराजाची आजची अगतिकता इतिहास सांगतो की, एल निनोच्या काळातही भारताने जिद्दीने उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. मान्सूनचे गणित बिघडले तरी शेतकऱ्याने आपल्या घामाच्या जिवावर मातीचं सोनं करण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. पण आज जेव्हा जेव्हा आभाळ कोरडं राहतं, तेव्हा बळीराजाच्या डोळ्यांसमोर लेकरांचं भविष्य, कर्जाचा डोंगर आणि पिकरहित रानांचं चित्र उभं राहतं. विज्ञानाने एल निनोची कारणे शोधली, त्याची वारंवारता मोजली; पण कोरड्या पडलेल्या जमिनीची तहान अजूनही विज्ञानाला पूर्णपणे भागवता आलेली नाही..!

आजही बळीराजा याच अपेक्षेने आभाळाकडे पाहत बसला आहे की, कधीतरी हे हवामानाच चक्र बदलेल, एल निनोचे सावट दूर होईल आणि माझ्या शेतात पुन्हा आनंदाची बरसात होईल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed