​राजकीय धक्कातंत्र..! उमेदवारीबाबतचा सस्पेंस शेवटपर्यंत कायम ठेवत सुनेत्रावहिनी पवार, पार्थदादा आणि जयदादांची दबावाला न जुमानता मास्टरस्ट्रोक खेळी..!

0
IMG-20260929-WA0062
Spread the love

सोमेश्वरनगर:
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात ऐन मोक्याच्या क्षणी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. उमेदवारांच्या निवडीबाबत शेवटच्या टप्प्यापर्यंत कमालीचा सस्पेंस कायम ठेवत, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, पार्थदादा पवार आणि जयदादा पवार यांनी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता अत्यंत शिताफीने आपली सर्वसमावेशक अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली आहे..!

​गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्जांच्या छाननीवरून आणि जागावाटपावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. अनेक स्तरातून मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र पवार कुटुंबीयांनी अत्यंत संयम आणि गुप्तता पाळत रणनीती आखली. ऐनवेळी शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी सर्व घटकांना न्याय देणारा ‘मास्टरस्ट्रोक’ मारला आहे..!

​गेल्या अनेक दशकांपासून सोमेश्वर कारखान्याने केवळ साखरेचे उत्पादन केले नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात गोडवा निर्माण केला आहे. शेतकरी सभासदांच्या घामाचे मोल, त्यांच्या मुलांचे भविष्य आणि संपूर्ण परिसराचा आर्थिक कणा असलेल्या या कारखान्याची धुरा पुन्हा एकदा अनुभवी, अभ्यासू आणि निष्ठावंत हातांमध्ये सोपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे..!

​नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गटातून शेतकरी, तरुण आणि अनुभवी नेतृत्वाचा समतोल साधत जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे.
​निंबूत खंडाळा गट क्र. १ (सर्वसाधारण): श्री. अभिजीत सतिश काकडे (निंबूत), श्री. प्रमोद भगवानराव काकडे (निंबूत), डॉ. श्री. वसंतराव रामराव दगडे (निरा शिवतक्रार) | इ.मा.व.: श्री. शैलेश पंढरीनाथ रासकर (खंडोबाचीवाडी) | भ.ज. व वि.मु.ज.: श्री. अशोक चंद्रकांत धायगुडे (अंदोरी)


​मुरूम वाल्हा गट क्र. २ (सर्वसाधारण): श्री. विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी), श्री. ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड (करंजेपूल), श्री. राजवर्धन शिवाजीराव शिंदे (मुरूम) | ब वर्ग: श्री. संग्राम तानाजी सोरटे (सोरटेवाडी)


​हॊळ मोरगाव गट क्र. ३ (सर्वसाधारण): श्री. रविंद्र जयवंतराव भापकर (लोणी भापकर), श्री. मकरंद चंद्रकांत सस्ते (सस्तेवाडी), सौ. मनिषा आनंदकुमार होळकर (सदोबाचीवाडी) | अनुसुचित जाती – जमाती: श्री. द्वारकोजी गुलाब साळवे (वडगांव निं.)


​को-हाळे सुपा गट क्र. ४ (सर्वसाधारण): श्री. राजेंद्र हरिभाऊ बोरकर (बोरकरवाडी), श्री. अक्षय धनंजय खलाटे (माळवाडी लाटे), श्री. सुनिल नारायण भगत (को-हाळे बु.) | महिला: सौ. प्रणिता मनोज खोमणे (कोऱ्हाळे खु.)


​मांडकी जवळार्जुन गट क्र. ५ (सर्वसाधारण): श्री. सतिश संपत जगताप (मांडकी), श्री. सुधाकर ज्ञानोबा टेकवडे (जवळार्जुन), श्री. उत्तम महादेव धुमाळ (जेऊर)
महिला-सौ. छबुबाई अंकुश नाझिरकर (नाझरे)..!

​उमेदवारांची नाव निश्चिती अंतिम टप्प्यापर्यंत गोपनीय ठेवून विरोधकांची रणनीती निष्फळ ठरवत, जुन्या-नव्यांचा समतोल राखत ही संतुलित यादी जाहीर करण्यात आली आहे. “सोमेश्वर हा केवळ साखर कारखाना नसून आमचे कुटुंब आहे, आणि या कुटुंबाचा विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करत,
स्व लोकनेते-विकासपुरुष अजितदादांच्या दूरदृष्टीवर आणि नेतृत्वावर निष्ठा ठेवून या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी जागृत सभासद बंधू आणि भगिनींना केले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed