सोमेश्वर कारखाना निवडणूक -प्रवीण मगर यांचा राष्ट्रवादीच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलला जाहीर पाठिंबा,’कारखान्याचे हित अन् सभासदांचे कल्याण हीच माझी प्राथमिकता’..!
सोमेश्वरनगर
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची (२०२६-३१) रणधुमाळी सध्या रंगात आली असून, निवडणुकीच्या तोंडावर एक अत्यंत महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या कलाटणी देणारी घडामोड समोर आली आहे. ऊस उत्पादक सभासद मुरूम-वाल्हा गट क्रमांक २ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रबळ दावेदार श्री. प्रवीण युवराज मगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजित दादा पवार पॅनेल’ला आपला पूर्ण, अधिकृत आणि सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.कारखान्याची उज्ज्वल परंपरा, ऊस उत्पादकांचे हित आणि सहकाराची ताकद अबाधित ठेवण्यासाठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा कारखान्याचा विकास मोठा, हा विचार मनाशी बाळगून प्रवीण मगर यांनी हा भावनात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे..!
प्रवीण मगर यांनी मुरूम-वाल्हा गटातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एक अर्ज त्यांनी वेळेत मागे घेतला, तर दुसरा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे तांत्रिकदृष्ट्या कायम राहिला. परंतु, निवडणुकीच्या रिंगणात तांत्रिकदृष्ट्या नाव असले तरी, मनाने आणि विचाराने आपण पूर्णपणे पक्षाच्या आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..!
*सहकाराची एकजूट हीच काळाची गरज’ – प्रवीण मगर*
आपली भूमिका स्पष्ट करताना प्रवीण मगर अत्यंत भावुक व ठामपणे म्हणाले, सोमेश्वर कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित आणि यशस्वी परंपरा जपली आहे. आज कारखान्याचा सर्वांगीण विकास आणि ऊस उत्पादक बंधू-भगिनींचे कल्याण साधायचे असेल, तर विचारांची आणि सहकाराची एकजूट असणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वावर सुनेत्रावहिनी, पार्थदादा व जयदादा आणि पक्षाच्या विचारांवर माझा अढळ विश्वास आहे. त्यामुळेच मी या निवडणुकीत अधिकृत पॅनेलच्या पाठीशी ताकदीने उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे..!
आपला उमेदवारी अर्ज तांत्रिकदृष्ट्या उरला असला तरी, आता प्रत्यक्ष निवडणूक न लढवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी स्वतः प्रचारकार्यात झोकून देणार असल्याचे त्यांनी घोषित केले.तसेच, “माझ्या सर्व समर्थक, जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आणि सभासद बंधू-भगिनींनी कोणतीही द्विधा मनःस्थिती न ठेवता, कारखान्याच्या आणि आपल्या भविष्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजित दादा पवार पॅनेल’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे,” असे भावनिक आवाहनही त्यांनी या वेळी केले.प्रवीण मगर यांच्या या निर्णयामुळे मुरूम-वाल्हा गटासह संपूर्ण कारखाना क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलची ताकद अधिक वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे..!
