वडगाव निंबाळकर पोलिसांकडून दोन इसमांना दोन वर्षांसाठी हद्दपार, हद्दपार आदेशाची अंमलबजावणी पूर्ण..!
वडगाव निंबाळकर
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन इसमांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. तेजस उर्फ दादू विजय सवाणे, वय २४ वर्षे,
२. अनिकेत उर्फ चिक्या विजय सवाणे, वय २७ वर्षे,
दोघेही रा. वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे.
सदर आदेशानुसार, वरील दोन्ही इसमांना पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली तालुके, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका या क्षेत्रांतून दोन वर्षे (२४ महिने) कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सदर कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे, पोलीस हवालदार खेडकर, देवकर, तांबे, इनामदार,शेगर शेलार, खांडेकर, शिंदे तसेच पोलीस शिपाई पवार, जाधव, यादव, परगे, धोत्रे, भोसले व येटाळे यांनी केली.
