गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी..! राष्ट्रपुरुष स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा बँकेचे बॉण्ड्स उपलब्ध; मिळणार ८.५०% घसघशीत व्याज..!

0
IMG-20260718-WA0009
Spread the love

पुणे –
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) वतीने गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रपुरुष स्व. अजितदादा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बँकेने आपली विशेष बॉण्ड योजना जाहीर केली आहे. पुढील आठवड्यापासून हे बॉण्ड्स गुंतवणुकीसाठी खुले होणार असून, यावर तब्बल ८.५०% या आकर्षक दराने व्याज दिले जाणार आहे तसेच प्रत्येक तिमाहीला खातेदारांच्या खात्यावर व्याज जमा होणार ..!

गुंतवणुकीवर सुरक्षित आणि अधिक परतावा..!
सध्याच्या अस्थिर बाजारपेठेच्या काळात सुरक्षित आणि हमखास परतावा शोधणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सामान्यतः इतर बँकांच्या मुदत ठेव (FD) दरांच्या तुलनेत पुणे जिल्हा बँकेने जाहीर केलेला ८.५०% व्याजदर हा अत्यंत आकर्षक मानला जात आहे. ज्येष्ठ नागरिक, पगारदार वर्ग, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांसाठी ही गुंतवणुकीची उत्तम संधी असेल..!

पुढील आठवड्यापासून विक्री सुरू..!
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष बॉण्ड्सची विक्री पुढील आठवड्यापासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये अधिकृतपणे सुरू होईल. ‘स्व. अजितदादा’ यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे..!

महत्त्वाचे मुद्दे:
व्याजदर: ८.५०%
उपलब्धता- पुढील आठवड्यापासून (सर्व शाखांमध्ये)

वैशिष्ट्य- सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या पुणे जिल्हा बँकेच्या शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे बँकेमार्फत सांगण्यात आले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed