बारामती विधानसभा: ४१% ‘SIR’ चे काम पूर्ण; मिळाली ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..!(८ ऑगस्ट रोजी होणार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध )
बारामती
तालुक्यातील आगामी ५३ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरिक्षण आणि दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. सध्या मतदारसंघात ‘SIR’ ( गृह भेटींद्वारे मतदार पडताळणी) चे ४१% काम पूर्ण झाले आहे. हे काम अधिक अचूक आणि शंभर टक्के पूर्ण व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बीएलओ (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) यांना आता ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे..!
(बारामती मतदार संघात एकूण ३८०००० हजार मतदार आहेत पैकी जवळजवळ २०००० मतदार हे मयत,दुबार, स्थलांतरित आहेत.आगामी काळात सव्वादोन ते अडीच लाख मतदारांचा विधानसभा मतदार संघ होणार आहे असे समजते,त्यामुळे ही प्रक्रिया महत्वाची मानली जात आहे)
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेनंतर ८ ऑगस्ट रोजी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
कामाचा आढावा आणि मुदतवाढीचे कारण –
बारामती विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे आणि नवीन मतदारांची नोंदणी करणे यासाठी बीएलओ सध्या युद्धपातळीवर काम करत आहेत.
सध्याची स्थिती – आतापर्यंत जवळपास ४१% मतदारांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे.
मुदतवाढ- पावसाळा आणि काही तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ७ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे, जेणेकरून एकही पात्र मतदार यादीतून सुटणार नाही..!
८ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार –
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी बीएलओ आपला अंतिम अहवाल सादर करतील. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी अधिकृतरीत्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीमध्ये नागरिकांना आपली नावे तपासता येतील. तसेच, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यावर हरकती व दावे दाखल करण्यासाठी ठराविक मुदत दिली जाईल..!
प्रशासनाचे आवाहन –
(मतदार यादी अत्यंत पारदर्शक आणि अचूक असावी यासाठी बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या बीएलओना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, जेणेकरून ८ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या यादीत कोणतीही त्रुटी राहणार नाही)
