तुकाराम मुंडेंचा भन्नाट किस्सा- मी ड्रिंक घेतोय, टेस्ट बरोबर नाही, टीम पाठवा..!
अल्कोहॉलिक आणि नॉन-अल्कोहॉलिक ड्रिंक्सची गुणवत्ता, लेबलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रक्रिया एफडीएच्या (FDA) अधिकारात येत असून, सध्या या संदर्भातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे, असे वक्तव्य वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांनी केले.
नुकतेच एका मुलाखती दरम्यान घडलेला किस्सा तुकाराम मुंडे यांनी सांगितला याबरोबर त्यांनी या अनुषंगाने हेही स्पष्ट केले कि ब्रँड च्या नावाखाली बाजारात अनेक नामांकित ब्रँड च्या डुप्लिकेट अल्कोहो्लिक व्हिस्की, बिअर आणि वाईन विकल्या जातात. त्याकडे वेळ मिळाल्यानंतर मोर्चा वळवणार असल्याचे सांगितले..!
दादू चढत नाही म्हणूनही फोन येतात..!
” दारू ही माझ्याच अधिकारामध्ये येते. त्यातील भेसळ रोखण्यासाठी लोकांकडून सतत फोन येत आहेत आणि त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. अनेकदा रात्री लोक प्यायला बसल्यावर फोन करून सांगतात की दारू चढत नाही..! ”
तुकाराम मुंडे – अन्न व औषध प्रशासन आयुक्त, महाराष्ट्र राज्य
एफडीए विभागात हे काम सुरू केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींसाठी २४ तास (२४x७) सुरू असणारा एक टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला होता, असा अनुभव त्यांनी सांगितला.या टोल फ्री नंबरवर येणाऱ्या अजब-गजब अनुभवांचा एक किस्सा सांगताना त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत घडलेली एक मजेशीर घटना शेअर केली. रात्रीच्या ड्युटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्यांना भेटून आपली ड्युटी सकाळी बदलून देण्याची विनंती केली. रात्रीच्या वेळी त्रास होत असल्याचे सांगत कर्मचाऱ्याने रात्री कमी कॉल येत असले तरी येणारे फोन अतिशय विचित्र असतात, असे स्पष्ट केले..!
रात्री साधारण ११ ते १२ च्या दरम्यान येणाऱ्या फोनवर नागरिक थेट तुकाराम मुंडेंचा नंबर मागतात आणि त्यांच्याशी बोलायच्या जिद्दीला पेटतात. कर्मचाऱ्यांनी नंबर नसल्याचे आणि तक्रार नोंदवून कारवाई करण्याचे सांगितल्यानंतरही ते ऐकत नाहीत. शेवटी वैतागून ते, “तुमची टीम इकडे पाठवा, मी सध्या ड्रिंक घेतोय आणि या ड्रिंकची टेस्ट बरोबर नाहीये,” असे म्हणतात. हा सर्व प्रकार अगदी खरा असून यात कोणतीही अतिशयोक्ती नाही, असे तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केले आहे..!
