बारामतीत जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची धमकी,मोराळवाडी येथील दोघांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल..!

0
IMG-20260721-WA0000
Spread the love

बारामती (पुणे ग्रामीण)

मौजे मोराळवाडी (ता. बारामती) येथे जिल्हा परिषद शाळेसमोर फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..!

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोराळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादी यांना विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी मानहानी केली. तसेच हातात दगड घेऊन दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.दाखल झालेले गुन्हेयाप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६ अन्वये खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ चे कलम ३(१)(आर), ३(१)(एस) व ६.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२), २९६ आणि ३(५).

आरोपींची नावे

१. निलेश हनुमंत मासाळ (रा. मोराळवाडी, ता. बारामती, जि. पुणे)

२. राहुल हनुमंत मासाळ (रा. मोराळवाडी, ता. बारामती, जि. पुणे)

सदर गुन्ह्याचा अधिक व पुढील तपास बारामती विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed