चौधरवाडी येथे शंभर वर्षांची परंपरा जपत बेंदूर सण उत्साहात संपन्न, ‘सर्जा-राजा दहशत फॅन्स क्लब’ व ग्रामस्थांचा उपक्रम..!

0
IMG-20260727-WA0009
Spread the love

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी)

कृषी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्जा-राजाच्या ऋणातून व्यक्त होणारा ‘बेंदूर सण’ चौधरवाडी येथे अत्यंत उत्साहात, भक्तिमय आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. चौधरवाडीमध्ये हनुमंत दत्तात्रय चौधरी हे ही समृद्ध परंपरा जवळपास शंभर वर्षांपासून अतिशय निष्ठेने व श्रद्धेने जोपासत आहेत.वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीची या दिवशी खांद्याला हळद लावून, अंगावर रंगीबेरंगी नक्षीकाम करून, बाशिंग व मोरपिसांनी सजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली..!

या सोहळ्यासाठी मा. सरपंच बाळासाहेब चौधरी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोरख चौधरी,हनुमंत दत्तात्रय चौधरी,आणि उमेश चौधरी यांच्यासह सर्जा राजा दहशत फॅन्स क्लब, चौधरवाडी व सर्व ग्रामस्थांनी विशेष पुढाकार घेतला होता..!

फलटणच्या ‘हलगी ग्रुप’चे खास आकर्षण.फलटणच्या हलगीच्या कडकडाटावर आणि निनादणाऱ्या तालावर चौधरवाडीतील तरुणांनी व ग्रामस्थांनी ठेका धरत मिरवणुकीचा आनंद द्विगुणीत केला. हलगीच्या निनादाने संपूर्ण चौधरवाडी परिसर दुमदुमून गेला होता..!

शंभर वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षाने पार पडला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed