NEET परीक्षा (NEET UG)- वैद्यकीय शिक्षणासाठीची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व नियम – सविस्तर बातमी..!

0
Screenshot_20260724_193943_Google
Spread the love

भारतात वैद्यकीय क्षेत्रात (MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS इत्यादी) प्रवेश मिळवण्यासाठी NEET (National Eligibility cum Entrance TEST) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा NTA (National Testing Agency) मार्फत आयोजित केली जाते..!

त्यासाठी पात्रता निकष पूर्ण असणे आवश्यक आहे.वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्र पडताळणीवेळी १२ वीचे मूळ गुणपत्रक (Marksheet) आणि आवश्यक जात/आरक्षण प्रमाणपत्रे सादर करावी लागतात.खालील पात्रता निकष पूर्ण असणे आवश्यक आहे-

१. शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र या विषयांसह इंग्रजी विषय घेतलेला असणे आवश्यक आहे. किमान गुण (PCB मध्ये मिळून)- खुला प्रवर्ग (General/EWS) १२ वीत PCB (Physics, Chemistry, Biology) विषयात एकत्रित किमान ५०% गुण असणे आवश्यक,राखीव प्रवर्ग (OBC / SC / ST) किमान -४०% गुण,दिव्यांग – ४५%..! ज्या विद्यार्थ्यांचा १२ वीचा निकाल बाकी आहे, ते देखील परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

२. वयोमर्यादा – प्रवेश घेण्याच्या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत उमेदवाराचे वय किमान १७ वर्षे पूर्ण असावे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने कमाल वयोमर्यादा हटवली आहे. त्यामुळे कोणत्याही वयाचे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात.

३.NEET परीक्षेसाठी प्रयत्नांवर कोणतीही मर्यादा नाही . पात्र उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात.

४. राष्ट्रीयत्व – भारतीय नागरिक,अनिवासी भारतीय,भारतीय वंशाचे नागरिक,भारताचे परदेशी नागरिक..!

(SOURCE)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed