नक्की काय आहे NEET आणि UPSC चे वास्तव..?

0
1784863718550
Spread the love

वास्तव
देशातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या NEET (UG)आणि UPSC (नागरी सेवा) परीक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी आपली नशीब आजमावतात. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आणि प्रशासकीय सेवेत (IAS/IPS) जाण्यासाठी या दोन परीक्षा देशातील सर्वात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षा ठरल्या आहेत..!

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) आयोजित केली जाणारी NEET UG ही देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता या परीक्षेतील स्पर्धा उत्तरोत्तर तीव्र होत चालली आहे..!

2024- नोंदणीकृत विध्यार्थी~२४.०६ लाख,प्रत्यक्ष परीक्षार्थी ~२३.३३ लाख,पात्र ठरणारे विध्यार्थी (Qualified ) ~१३.१५ लाख
2025 ~नोंदणीकृत विध्यार्थी-२२.७६ लाख,प्रत्यक्ष परीक्षार्थी ~२२.०९ लाख,पात्र ठरणारे विध्यार्थी (Qualified ) ~१२.३६ लाख
2026 ~नोंदणीकृत विध्यार्थी- २२.७९ लाख, प्रत्यक्ष परीक्षार्थी १९.९९ लाख , पात्र ठरणारे विध्यार्थी (Qualified ) ~११.२१ लाख

दरवर्षी नोंदणी करणाऱ्यांपैकी साधारण ८८% ते ९५% विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देतात.
एकूण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५६% ते ५९ विद्यार्थी कट-ऑफ पार करून पात्र ठरतात..!
नीट परीक्षेत पात्र ठरणाऱ्यांमध्ये ५५% ते ५८% पेक्षा जास्त महिला असतात..!


केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदांसाठी (IAS, IPS, IFS इत्यादी) तीन टप्प्यांत ही परीक्षा घेतली जाते..!

एकूण अर्जदार १० लाख ते १३ लाख
पूर्व परीक्षा देणारे ५.५ लाख ते ६ लाख
मुख्य परीक्षेसाठी निवड १३,००० ते १४,६००
२,५०० ते २,९००
अंतिम निवड ९०० ते १,१००

अर्जांचा आकडा १० ते १३ लाखांच्या घरात असला, तरी प्रत्यक्ष पूर्व परीक्षेला साधारण ५ ते ६ लाख उमेदवारच उपस्थित राहतात..!
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत जाण्याचा दर केवळ १% ते १.५% असतो, तर अंतिम निवडीचा दर ०.१% पेक्षाही कमी असतो..!

NEET परीक्षेत दरवर्षी २० ते २३ लाख विद्यार्थी प्रत्यक्ष बसतात, तर UPSC पूर्व परीक्षेत ५ ते ६ लाख विद्यार्थी प्रत्यक्ष बसतात. NEET मध्ये पात्रतेचे प्रमाण जास्त असले तरी MBBS च्या मर्यादित जागांमुळे खरी स्पर्धा अव्वल गुणांसाठी असते, तर UPSC मध्ये प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या प्रचंड गाळणीमुळे ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक परीक्षा मानली जाते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed