आगामी काळात तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात निवडणुकांचा धुरळा उडणार; सोमेश्वर कारखाना व ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापणार..!

0
someshwar_factory

????????????????????????????????????

Spread the love

✍️खास बातमीपत्र

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यात आगामी काळात निवडणुकांचा मोठा धुरळा उडणार आहे. या भागाचे अर्थकारण आणि राजकारण ज्याच्या भवती फिरते, तो श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि त्यासोबतच अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असल्याने संपूर्ण पश्चिम पट्ट्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.’सोमेश्वर’ची निवडणूक होणार असल्याने सत्तेचा संग्राम पेटणार आहे.तालुक्यातील शेतकरी आणि सभासदांची कामधेनू असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ही नेहमीच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेते..!

अटीतटीची लढत – कारखान्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्थानिक नेते आणि सत्ताधारी प्रस्थापित गटांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.उमेदवारांची चाचपणी सुरु सभासदांचे प्रश्न, ऊस दर, कारखान्याचे नियोजन आणि विकासकामांच्या जोरावर सभासदांना आकर्षित करण्यासाठी बैठकांचा आणि जोडण्यांचा धडाका सुरू झाला आहे..!

ग्रामपंचायत निवडणुकांचा रंग – गावकी-भावकीचे राजकारण ऐरणीवर येणार..? सोमेश्वर कारखान्याच्या रणधुमाळीसोबतच पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत. गट-तटांचे राजकारण आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावकी-भावकीचे राजकारण आणि अंतर्गत गट-तट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.तरुणांची फळी सोबतीला घेऊन स्थानिक पातळीवर सत्ता काबीज करण्यासाठी तरुणांचे गट आणि जुने-जाणते नेते एकत्र येत रणनीती आखत आहेत.राजकीय वर्तुळात हालचाली वाढलेल्या एकंदरीत दिसत आहेत..!

“पश्चिम पट्ट्यातील निवडणुका या केवळ स्थानिक उरल्या नसून, त्याचा परिणाम आगामी काळातील मोठ्या राजकीय समीकरणांवर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे व गटांचे नेते या भागावर विशेष लक्ष ठेवून आहेत.या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुका एकाच कालावधीत किंवा मागे-पुढे येत असल्याने कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडणार आहे. चौका-चौकात, हॉटेल्समध्ये आणि पारावर आतापासूनच निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात पश्चिम पट्ट्यात राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचणार, हे निश्चित..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed