बारामती – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय, सन २०२५-२०२६ साली तुटलेल्या उसाला जाहीर झाला सर्वोच्च दर..!
सोमेश्वर नगर
आगामी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली आहे. दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांची दूरदृष्टी आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने २०२५-२६ हंगामातील उसाला तब्बल रु. ४,००० प्रती टन असा शिखर दर जाहीर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे बारामती तालुक्यासह सहकार क्षेत्रात एकच चर्चा रंगली असून सभासद शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि संचालक मंडळाने जिजाऊ सभागृहात घेतलेल्या एकमत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या बैठकीस कारखान्याचे सर्व प्रमुख संचालक व अधिकारी उपस्थित होते..!
या माध्यमातून कारखाण्याची शिखर दराची परंपरा कायम राहिली आहे.गतवर्षीची FRP रु. ३,२८५ असताना कारखान्याने सुरुवातीलाच रु. ३,३०० एकरकमी दिले होते. आता नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत तुटलेल्या उसाला FRP पेक्षा ५१५ अधिकचा भाव ३८००घोषित झाला आहे तसेच फेब्रुवारीचे रु. १०० आणि मार्चचे रु. २०० असे विशेष अनुदान जोडून थेट रु. ४,००० प्रती टन अंतिम दर देण्यात आला आहे..!
स्व दादांच्या नेतृत्वाचे भक्कम मार्गदर्शन हे कायमच कारखान्याला लाभलेले आहे.स्व. अजितदादांच्या विचारांचा व सहकारातील समृद्ध वारसा पुढे चालवत, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा कळसाध्याय मानून हा निर्णय घेण्यात आला आहे..!
निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचे राजकारण व सामाजिक परिणाम होणार हे निश्चित आहे.शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते का हेही पाहणे निश्चितच ओस्तुक्याचे ठरणार आहे? आगामी कारखाना निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या, या अंतिम भावामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोख रक्कम येणार असून, सभासदांमध्ये कारखान्याच्या मार्गदर्शक नेतृत्वाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. निवडणुका कोणत्याही असोत, परंतु सहकाराच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य देण्याची सोमेश्वरची परंपरा या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे..!
“स्व. अजितदादांचे विचार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याने नेहमीच सभासदांना सर्वोच्च दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. सोमेश्वर च्या सभासदांना उसाला मिळालेला रु. ४,००० चा हा दर राज्यातील सहकारी कारखानदारीत मैलाचा दगड ठरेल..!”
