एमजी मोटर्स आणि जेएसडब्ल्यू ग्रुपची धोरणात्मक भागीदारी आणि भविष्यातील वाटचाल..!
भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या मोठे बदल होत असून, प्रसिद्ध ब्रँड एमजी मोटर्स आणि भारतातील आघाडीचा उद्योग समूह जेएसडब्ल्यू ग्रुप यांच्यातील भागीदारी अत्यंत चर्चेत आहे.मॉरिस गॅरेज ही मूळची ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी आहे.परंतु सध्या या ब्रँडची मालकी पूर्णपणे चीनच्या SAIC मोटर – Shanghai Automotive Industry Corporation या सरकारी कंपनीकडे आहे. तसेच भारतात या ब्रँडचा कारभार ‘जेएसडब्ल्यू ग्रुप’ सोबतच्या संयुक्त भागीदारीत JSW MG Motor इंडिया चालवला जातो.
एमजी मोटर्सचे भारतातील JSW कंपनी बरोबर कोलॅबोरेशन आहे.भारतात एमजी मोटर्सची मूळ कंपनी चिनी ऑटोमेकर SAIC Motor आहे. भारतीय बाजारातील धोरणात्मक बदलांनुसार, SAIC ने भारतातील जेएसडब्ल्यू ग्रुप सोबत मिळून एक जॉइंट व्हेंचर स्थापन केले आहे, ज्याचे नाव ‘JSW MG Motor India’ असे आहे.या भागीदारीमध्ये सुरुवातीला जेएसडब्ल्यू ग्रुपने ३५% हिस्सा विकत घेतला होता. याशिवाय इंडोएज इंडिया फंड, डीलर ट्रस्ट आणि कर्मचाऱ्यांकडेही काही हिस्सा असून, मूळ चिनी कंपनी SAIC कडे सुरुवातीला ४९% हिस्सा होता. अलीकडच्या घडामोडींनुसार, जेएसडब्ल्यू आपला वादा आणखी वाढवून या संयुक्त प्रकल्पात आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.जेएसडब्ल्यू ग्रुपचा विस्तार आता केवळ पोलाद किंवा सिमेंटपुरते मर्यादित न राहता, तो भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रांकडे अत्यंत वेगाने आक्रमक वाटचाल करत आहे..!
एमजी सोबतच्या भागीदारीशिवाय, जेएसडब्ल्यू आता ‘JSW Motors’ या नावाने स्वतःचा स्वतंत्र कार ब्रँड देखील आणत आहे. चायनीज ऑटोमेकर ‘चेरी’ सोबतच्या करारांतर्गत, ते भारतात लवकरच नवीन एसयूव्ही उदा. जेटौर टी२ वर आधारित प्लग-इन हायब्रिड मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते स्वतंत्र डीलर नेटवर्क देखील उभारत आहेत..!
जेएसडब्ल्यू एनर्जीने आपल्या ‘व्हिजन ३.०’ अंतर्गत २०३० पर्यंत तब्बल ३० गिगावॅट वीज निर्मितीचे मोठे लक्ष्य ठेवले आहे, ज्यामध्ये अधिकाधिक भर हा सौर आणि पवन ऊर्जेवर असणार आहे. ऑटो क्षेत्रातील वाढत्या पावलांमुळे कंपनी इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या बॅटरी उत्पादनावर मोठा भर देत आहे. पर्यावरणपूरक उद्योगाला प्राधान्य देत जेएसडब्ल्यू आपल्या स्टील निर्मिती प्रकल्पांमध्ये ‘ग्रीन हायड्रोजन’चा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने भविष्य घडवत आहे..!
थोडक्यात, जेएसडब्ल्यू ग्रुप आगामी काळात भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी, ऑटोमोबाईल मार्केट आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रातील एक अत्यंत पॉवरफुल आणि प्रमुख ब्रँड म्हणून उदयाला येणार आहे..!
