महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,’महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राज्यभर राबवणार..!

0
1786724128102
Spread the love

विस्तृत बातमी
महसूल विभागातील प्रलंबित अर्धायन्यायिक प्रकरणे आता वेगाने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ संपूर्ण राज्यभरात आयोजित करण्यात येत आहे. या अभियानामुळे नागरिकांच्या महसूलविषयक प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत मिळणार आहे..!

अभियानाचा कालावधी-
सुरुवात- १ सप्टेंबर २०२६
समाप्ती- ३१ मार्च २०२७
स्वरूप-राज्यभर विशेष मोहीम

यामध्ये प्रामुख्याने
१ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा- महसूल विभागातील प्रलंबित अर्धायन्यायिक प्रकरणे आता वेगाने निकाली निघणार आहेत.
२ दोन्ही पक्षांच्या संमतीने तडजोड-या लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांच्या संमतीने सामंजस्याने तडजोड केली जाईल..!

  यामध्ये प्रलंबित महसुली दावे व अपिलांचा समावेश असणार आहे.

स्तर- मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी स्तरावरील सर्व प्रकरणांचा यात समावेश असेल.
नियोजन – दर तीन महिन्यांनी लोकअदालत घेतली जाईल.
वेळापत्रक – या अभियानाचे सविस्तर वेळापत्रक संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर केले जाणार आहे..!

सहभागी व्हा आणि लाभ घ्या…
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रलंबित प्रकरणांमधून सुटका होण्यासाठी नागरिकांनी या लोक अदालत अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed