महा-SIR अपडेट,पुण्यात प्रशासकीय घमासान तर मतदार यादीच्या अंतिम वळणावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!

0
1787020502244
Spread the love

जिल्हा विशेष

पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) अंतिम टप्प्यात ताज्या आकडेवारीने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. एका बाजूला ९९.९८% लक्ष साध्य करत प्रशासनाने विक्रमी गती दाखवली असली, तरी दुसरीकडे या प्रक्रियेमुळे भविष्यातील राजकारणावर आणि आमदारांच्या संख्येवर काय परिणाम होणार, याची चर्चा रंगू लागली आहे..!

पुण्याच्या SIR अहवालातील ठळक मुद्दे विस्तृत मध्ये नमूद

एकूण मतदार- ९०,८०,१७३

प्रपत्र वितरण (EF): १००%

पूर्ण (९०,७९,८५२)

ॲप अंकीकरण (Digitization): ६८.२७% (६१,९८,८०७)

अप्राप्य अर्ज (Uncollectable): ३१.७१% (२८,७९,७२८) (ज्यात प्रामुख्याने अनुपस्थित, मयत आणि स्थलांतरित नागरिकांचा समावेश आहे)..!

अंकीकरणात ग्रामीणची बाजी, तर शहरी भागात ‘अनकलेक्टेबल’ अर्जांचे आव्हान,या मोहिमेत ग्रामीण भागातील मतदारांची तप्तरता स्पष्टपणे दिसून येत असून, बारामती (८८.२१%), आंबेगाव (८६.९३%) आणि जुन्नर (८५.७४%) हे मतदारसंघ अंकीकरणात आघाडीवर आहेत.याच्या उलट चित्र पुणे शहरात पाहायला मिळत असून, खडकवासला (४६.८१%), कोथरूड (४६.५१%) आणि हडपसर (४५.९४%) या शहरी मतदारसंघांमध्ये अप्राप्य अर्जांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त आहे. स्थलांतर आणि इतर कारणांमुळे या भागातील बरीच नावे अंतिम यादीतून बाजूला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे..!

खासदार-आमदारांच्या संख्याबळावर काय होणार परिणाम होणार हे निश्चित आहे.अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर आणि पुनर्रचना तसेच वाढत्या लोकसंख्येच्या समीकरणांमुळे आगामी काळात पुण्यात शहरी आणि ग्रामीण भागात राजकीय प्रतिनिधित्वात मोठे बदल पाहायला मिळण्याची चर्चा आहे.अनेकांना आमदार – खासदार होण्याची संधी आहे फक्त संधीच सोनं करता आलं पाहिजे.वाढत्या शहरीकरणामुळे मतदारांच्या संख्येतील बदलांचे पडसाद थेट आगामी राजकीय आणि प्रादेशिक मतदारसंघांच्या रचनेवर पडण्याची चिन्हे आहेत..!

विशेष तळटीप- मतदार यादीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत आपले नाव तपासायचे असल्यास आणि अधिकृत माहितीसाठी आपण पुणे महानगरपालिका निवडणूक विभाग किंवा भारत निवडणूक आयोग (ECI) च्या संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed