जेजुरी देवस्थान आणि अभिजीत देवकाते यांच्याकडून निरावागज येथील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक सहाय्य..!
निरावागज
बारामती तालुक्यातील निरावागज येथील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी आणि जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे..!
या विशेष उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. कृतिका कांतीलाल कुंभार शारदानगर येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीला १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला..!
इतर विद्यार्थी यांनाही आर्थिक मदत देण्यात आली.यामध्ये सय्यद इनायत इरशाद, पितृछत्र हरपलेला स्वराज प्रमोद कुंभार, स्वरा ज्ञानेश्वर खरात, शुभ्रा अनिल जाधव आणि अजिनाथ देवकाते या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे धनादेश त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले..!
कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे शिक्षणाचा वाढता खर्च, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या पालकांना या आर्थिक सहाय्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांचे शिक्षण पैशांअभावी खंडित होऊ नये, यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची सामाजिक बांधिलकी जोपत गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदत केली जाईल, असा पुनरुच्चार अभिजीत देवकाते यांनी यावेळी केला..!
या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिक, पालक तसेच सर्वच स्तरातून अभिजीत देवकाते व जेजुरी देवस्थानच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे..!
