श्री निखिल शामराव काकडे देशमुख यांची निरा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड..!
निरा
नुकत्याच पार पडलेल्या निवडीमध्ये, निरा येथील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील परिचित व्यक्तित्व श्री. निखिल काकडे देशमुख यांची ‘निरा मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षपदी सर्वसम्मतीने निवड करण्यात आली आहे..!
श्री निखिल शामराव काकडे-देशमुख यांची निरा केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष पदी व श्री अनिकेत उत्तम माने यांची उपाध्यक्ष पदी व पै श्री ऋषिकेश विलासराव धायगुडे यांची सचिव पदी निवड झालेली आहे..!
या निवडीमुळे निरा परिसरातील वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री. निखिल काकडे देशमुख यांच्या या यशस्वी आणि प्रेरणादायी वाटचालीबद्दल विविध स्तरावरून त्यांना पुढील कार्यकालसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत..!
त्यांच्या या नव्या कार्यकाळात निरा शहरातील वैद्यकीय क्षेत्राचा विकास अधिक जोमाने होईल आणि समाजसेवेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे..!
