ऑटोमोबाईल स्पेशल-जून २०२६ मध्ये मिड-SUV सेगमेंटमध्ये महिंद्राचा दबदबा,स्कॉर्पिओ ठरली नंबर १..!

0
Screenshot_20260723_070523_Google
Spread the love

प्रतिनिधी – ऑटो डेस्क

भारतीय ऑटोमोबाईल विश्वात मिड-SUV (Mid-SUV) गाड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जून २०२६ मधील विक्रीची ताजी आकडेवारी समोर आली असून, या महिन्यात महिंद्रा (Mahindra) कंपनीने भारतीय बाजारावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. महिंद्राची ऑल-टाईम फेव्हरेट स्कॉर्पिओ तब्बल १४,०९७ युनिट्स च्या विक्रीसह अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे..!

उपलब्ध माहितीनुसार जून २०२६: टॉप १० मिड-SUV विक्रीची आकडेवारी,दिलेल्या आकडेवारीनुसार जून २०२६ मध्ये कोणत्या मॉडेलच्या किती गाड्या विकल्या गेल्या, त्याची यादी खालीलप्रमाणे देत आहोत.

१.स्कार्पिओ महिंद्रा १४,०९७

२. थार महिंद्रा १०,६६९

३. विक्टोरिअस मारुती सुझुकी १०,०३५

४.सेल्टोस किआ ९,६५४

५.एक्सयुव्ही 7XO महिंद्रा ९२४४

६.बोलेरो महिंद्रा ९,११५

७.हायरायडर टोयोटा ९,१०४

८.ग्रँड विटारा मारुती सुझुकी ९,०९२

९.क्रेटा ह्युंदाई ७,१६८

१०.सिएरा टाटा मोटर्स ६,३९२

मार्केट शेअर्सचा विस्तृत आढावा

1. महिंद्रा अँड महिंद्रा — ४५.६% शेअर्स एकूण विक्री- ४३,१२५ युनिट्स (स्कॉर्पिओ, थार, XUV 7XO आणि बोलेरो) टफ डिझाईन, शक्तिशाली इंजिन आणि ऑफ-रोडिंग क्षमतांमुळे महिंद्राने मिड-SUV मार्केटमधील जवळजवळ निम्मा हिस्सा आपल्या नावे केला आहे.

2. मारुती सुझुकी — २०.२% शेअर्स मारुतीने आपल्या हायब्रिड तंत्रज्ञान आणि विश्वासाच्या जोरावर अव्वल ३ आणि ८ व्या स्थानावर स्थान कायम ठेवले आहे.

3. किआ मोटर्स — १०.२% शेअर प्रीमियम फीचर्स आणि आकर्षक लुक्समुळे किआ सेल्टोस तरुण ग्राहकांमध्ये सातत्याने लोकप्रिय राहिली आहे.

4. टोयोटा — ९.६% शेअर्स टोयोटाची हायरायडर ही तिच्या भक्कम गुणवत्ता आणि हायब्रिड इंजिनमुळे स्थिर विक्री नोंदवत आहे.

5. ह्युंदाई — ७.६% शेअर्स ह्युंदाई क्रेटा ही कॉम्पॅक्ट व मिड-SUV मधील प्रमुख कार राहिली असून तिने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.

6. टाटा मोटर्स — ६.८% शेअर्स टाटाच्या नव्या ऑल-न्यू सिएरा मॉडेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे..!

बारामती परिसरातील प्रमुख ऑटोमोबाईल शोरूम्स,बारामती व आसपासच्या परिसरातील ग्राहकांसाठी या ब्रँड्सचे अधिकृत शोरूम्स आणि सर्व्हिस सेंटर्स उपलब्ध आहेत..!

भरणे मोटर्स महिंद्रा (Mahindra) – बारामती-भिगवण रोड / एमआयडीसी परिसर, बारामती.

महालक्ष्मी अरेना/नेक्सा मारुती सुझुकी (Maruti Suzuki – Arena & Nexa) फलटण रोड / निरा रोड, बारामती.

सोमाणी ह्युंदाई (Hyundai) – निरा बारामती रोड,बारामती.

जय टाटा मोटर्स (Tata Motors) बारामती – फलटण रोड, बारामती. ढोणे किआ Motors (Kia) – बारामती मोरगाव रोड, बारामती

शरयू टोयोटा (Toyota) – बारामती मोरगाव रोड,बारामती

ढोणे स्कोडा (Skoda)निरा – बारामती रोड,बारामती

या सर्व शोरूम बारामती ग्रामीण,बारामती शहर व एमआयडीसी सह इंदापूर,दौंड,अकलूज, करमाळा, फलटण,काष्टी तालुक्यांचा सर्व्हिस कनेक्ट्स सह जोडले गेले आहेत..!

थोडक्यात सांगायचे झाल्यास मजबूत बिल्ड क्वालिटी, रफ अँड टफ इमेज आणि आधुनिक फीचर्समुळे महिंद्राने जून २०२६ मध्ये मिड-SUV सेगमेंटमध्ये बाजी मारली आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed