बाल दिंडी व पालखी सोहळा २०२६ अत्यंत दिमाखात व उत्साहात संपन्न..!

0
IMG-20260722-WA0005
Spread the love

​चौधरवाडी
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘बाल दिंडी व पालखी सोहळा २०२६’ अत्यंत दिमाखात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात चिमुकल्या वारकऱ्यांसह ग्रामस्थ, पालक यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता..!

​शाळेच्या या उपक्रमामुळे संपूर्ण चौधरवाडी परिसर विठ्ठलनामाच्या गजर आणि भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.​कार्यक्रमादरम्यान विविध ग्रामस्थ व पालकांनी चिमुकल्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार तसेच अन्नदान केले. अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून बालवारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला..!

या सोहळ्यासाठी सरपंच श्री.शशांक पवार, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक लोणकर भाऊसाहेब, गावातील भजनी मंडळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी ताई व मदतनीस तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या..!​

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या, अन्नदान करणाऱ्या आणि उपस्थित राहून बालकांचे मनोबल वाढवणाऱ्या सर्व आदरणीय ग्रामस्थांचे तसेच पालकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापिका सौ बालगुडे व सौ खामकर मॅडम यांनी सर्वांचे मनापासून हार्दिक आभार मानले.
​सर्व ग्रामस्थांच्या आणि चिमुकल्यांच्या उत्साहामुळे हा पालखी सोहळा अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed