जेजुरीतील लक्ष्मीनारायण लॉजवर पोलिसांचा छापा,६ महिलांची सुटका, चालकाला अटक..!

0
1784733934595
Spread the love

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई,लॉज कायमस्वरूपी सील करण्याची स्थानिकांची जोरदार मागणी.

जेजुरी

जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनारायण लॉजमध्ये सुरु असलेल्या अवैध देहव्यापाराचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. २० जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या छाप्यात ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज चालक रामा नारायण मोगविरा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत..!

मिळालेल्या माहितीनुसार, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने आणि जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी या कारवाईचे नियोजन केले. पंचांच्या उपस्थितीत बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ६ महिलांची सुटका करण्यात आली तसेच आरोपी चालकाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे..!

आरोपी रामा मोगविरा याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. वारंवार अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा हा अवैध व्यवसाय सुरु करत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे..!

२०२१ मध्ये यवत येथील ‘निसर्ग लॉज’वर कारवाई करून तो कायमस्वरूपी सील करण्यात आला होता. त्याच धर्तीवर लक्ष्मीनारायण लॉजचा परवाना तातडीने रद्द करून तो सील करण्यात यावा, अशी ठाम मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच परिसरातील अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी व कडक कारवाईची मागणी होत आहे..!

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांच्या पथकाने केली..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed