भारतीय रस्त्यांवर चार दशकांची सत्ता अन मारुती सुझुकीचा कॉमन मॅन ते इलेक्ट्रिक फ्युचर चा अनोखा प्रवास..!

0
Screenshot_20260722_130826_Google
Spread the love

विशेष वृत्त
भारतातील सर्वसामान्य कुटुंबाला स्वतःच्या कारचे स्वप्न दाखवणारी आणि ते पूर्ण करणारी ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki India Limited) गेल्या चार दशकांपासून भारतीय ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे..!

मारुतीची स्थापना २४ फेब्रुवारी १९८१ रोजी ‘मारुती उद्योग लिमिटेड’ म्हणून झाली. त्यानंतर जपानच्या ‘सुझुकी मोटर कॉर्पोरेशन’सोबत झालेल्या ऐतिहासिक भागीदारीतून १४ डिसेंबर १९८३ रोजी मारुतीची पहिली हॅचबॅक कार — मारुती ८०० भारतीय बाजारात लाँच झाली. या एका कारने भारतातील ऑटोमोबाईल विश्वाचे चित्र कायमचे बदलून टाकले..!

ग्राहकांच्या गरजांनुसार उत्तम मॉडेल्स उपलब्ध आहेत.
मारुतीने नेहमीच भारतीय कुटुंबांचा विचार करून गाड्यांची रचना केली आहे. सध्या मारुती दोन मुख्य शोरूम नेटवर्कद्वारे आपल्या गाड्यांची विक्री करते –
1.एरिना (ARENA – बजेट आणि फॅमिली कार्स) –
अ.हॅचबॅक – अल्टो K10, वॅगनआर, स्विफ्ट,सेलेरिओ.
ब.सेडान व एमपीव्ही – डिझायर, एर्टिगा (Ertiga), ब्रीझा (Brezza).
2.नेक्सा (NEXA – प्रीमियम आणि लक्झरी कार्स) शोरूम मध्ये दोन सेगमेंट वितरण होते.
अ.प्रीमियम हॅचबॅक व सेडान: बलेनो,सियाझ .
ब.एसयूव्ही (SUV) रेंज – ग्रँड विटारा,एस क्रॉस,फ्रॉन्क्स, जिम्नी आणि इनव्हिक्टो.

सर्वोत्कृष्ट सर्व्हिस आणि विश्वासार्ह गुणवत्ता हीच खरी ओळख आहे.मारुती सुझुकीच्या यशाचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे त्यांची सर्व्हिस नेटवर्क आणि उत्कृष्ट मायलेज हे आहे..!

भारतातील लहानातील लहान शहरांपासून ते दुर्गम भागात मारुतीचे ४,००० पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्स उपलब्ध आहेत. मारुतीच्या गाड्यांची सर्व्हिसिंग अत्यंत परवडणारी असते आणि स्पेयर पार्ट्स सहज उपलब्ध होतात..!

मारुतीच्या गाड्यांना सेकंड हँड मार्केटमध्ये आजही सर्वात जास्त मागणी आणि उत्तम किंमत मिळते.सध्या मारुती सुझुकी आपल्या नवीन गाड्यांमध्ये गुणवत्ता आणि भक्कम पणे ६ एअरबॅग्स, ESP आणि हायटेक सेफ्टी फीचर्स देऊन गुणवत्तेचा दर्जा सतत उंचावत आहे..!

बदलत्या काळानुसार मारुती सुझुकी आता अधिक पर्यावरणपूरक आणि हायटेक तंत्रज्ञानाकडे वेगाने पावले टाकत आहे.मारुती सुझुकी लवकरच आपली पूर्णपणे ऑल-इलेक्ट्रिक SUV (eVX) भारतीय बाजारात उतरवणार आहे.पेट्रोलसोबतच उत्तम मायलेज देणाऱ्या स्ट्रॉंग हायब्रिड आणि Factory-fitted सान्ग गाड्यांवर कंपनीचा मोठा भर आहे. भविष्यात फ्लॅक्स-फ्युएल आणि बायो-सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या आणण्याचे मारुतीचे ध्येय आहे..!

“भारताची धडकन” मानली जाणारी मारुती सुझुकी केवळ गाड्या विकत नाही, तर कोट्यवधी भारतीयांचा विश्वास जपते. बजेट कारपासून सुरू झालेला हा प्रवास आता ग्रीन आणि इलेक्ट्रिक भविष्याकडे तितक्याच मजबूतीने वाटचाल करत आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed