वडगाव निंबाळकर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल,१३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार..!

0
IMG-20260721-WA0000
Spread the love

लोणीभापकर (बारामती) –

सायकलवरून शाळेत चाललेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा (अपहरणाचा) गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील दत्त मंदिराजवळ घडली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..!

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास १३ वर्षीय मुलगी सायकलवरून नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. लोणीभापकर येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर आधीच थांबलेल्या राखाडी (ग्रे) रंगाच्या मारुती इको चारचाकी वाहनातील चार अनोळखी इसमांनी या मुलीची सायकल अडवली. त्यानंतर तिला जबरदस्तीने वाहनात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.या घटनेप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) व ६२ नुसार चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी एपीआय जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड (ब.क्र. ९६०) करत आहेत..!

या घटनेतील संशयित व्यक्ती किंवा संबंधित राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed