मोठी बातमी – जिओ आणि एअरटेल युजर्सना मोठा धक्का; ‘या’ तारखेपासून बंद होणार ५G हॉटस्पॉट शेअरिंग..?

0
1784303977195
Spread the love

देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ (Jio) आणि भारती एअरटेल (Airtel) आपल्या कोट्यवधी युजर्सना एक मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ग्राहकांना मिळणारा अनलिमिटेड ५G डेटा आता हॉटस्पॉटद्वारे शेअर करता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे..!

सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, हा नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील अनलिमिटेड ५G डेटा इतर कोणत्याही डिव्हाइसला (उदा. लॅपटॉप, दुसरा मोबाईल किंवा टीव्ही) हॉटस्पॉटद्वारे जोडता येणार नाही..!

जर एखाद्या युझरने हॉटस्पॉट चालू करून ५G डेटा शेअर करण्याचा प्रयत्न केला, तर तो डेटा ‘अनलिमिटेड ५G’ मधून वापरला जाणार नाही. त्याऐवजी, युझरच्या नियमित डेली डेटा प्लॅनमधून (उदा. १.५ GB किंवा २ GB प्रतिदिवस या मर्यादेतून) तो डेटा वजा केला जाईल. याचा थेट अर्थ असा की, हॉटस्पॉट चालू करताच तुमचा दैनंदिन मर्यादित डेटा संपू शकतो..!

अनेक युजर्स एकाच मोबाईलच्या अनलिमिटेड ५G डेटावर हॉटस्पॉटच्या माध्यमातून घरातील किंवा ऑफिसमधील अनेक डिव्हाइसेस चालवत असल्यामुळे कंपन्यांच्या नेटवर्कवर प्रचंड ताण येत आहे. हा गैरवापर रोखण्यासाठी आणि आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी कंपन्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे..!

या निर्णयामुळे जे युजर्स मोबाईल हॉटस्पॉटचा वापर करून लॅपटॉप किंवा इतर कामांसाठी इंटरनेट चालवायचे, त्यांना आता स्वतंत्र डेटा पॅक किंवा ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागण्याची शक्यता आहे..!

20 तारखेपासून हे बदल अपेक्षित आहेत..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed