शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये २२ जुलै रोजी साजरी होणार स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

0
1000269629
Spread the love

१५ जुलै २०२६
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सन २०२६ या वर्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंती व राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमांमध्ये आता स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे..!

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, येत्या २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी मंत्रालयातील सर्व विभागांसह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात येईल..!

शासनाने स्पष्ट केले आहे की, हा आदेश केवळ मंत्रालयीन किंवा शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व निमशासकीय कार्यालये, सर्व शाळा आणि सर्व महाविद्यालयांनाही समान रीतीने लागू राहील.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम योग्य पद्धतीने आयोजित केला जाईल यावर देखरेख ठेवावी आणि आवश्यक त्या सूचना व अंमलबजावणीची कार्यवाही करावी, असे निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed