शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: ‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’च्या नियमांत बदल; जाणून घ्या कोणाला मिळणार ₹२ लाखांपर्यंतचा थेट लाभ..!
महाराष्ट्र शासनाने राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ च्या मूळ निकषांमध्ये अंशतः बदल करणारे नवीन शासन परिपत्रक (पूरकपत्र) १५ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहे.नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात मा. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार, आणि त्यानंतर १४ जुलै २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे..!नेमका काय बदल झाला? कोणाला मिळणार लाभ?
१. आधी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी (₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी)जुना लाभ घेतला असल्यासही पात्रता-ज्या शेतकरी बांधवांना यापूर्वी ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९’ चा लाभ मिळालेला आहे, ते देखील या सुधारित नियमांनुसार पात्र ठरू शकतात. कर्ज घेण्याचा कालावधी -अशा शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेकडून अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असावे किंवा त्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन (फेररचना) केलेले असावे. *थकबाकीची अट – या कर्जाचे हप्ते ३० सप्टेंबर २०२५* अखेर थकीत राहिलेले असावेत आणि *३१ मार्च २०२६* पर्यंत त्यांची परतफेड झालेली नसावी.कर्ज माफीची मर्यादा अशा सर्व कर्ज खात्यांमधील एकूण थकबाकी (मुद्दल आणि व्याजासह) जर २.० लाख रुपयांपर्यंत असेल, तर शासनातर्फे त्यांना जास्तीत जास्त २.० लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जाईल..!
२. एकवेळ समझोता (OTS) मधील बदल मूळ शासन निर्णयामध्ये ‘एकवेळ समझोता’ (OTS) आता पूर्णपणे वगळण्यात (रद्द करण्यात) आला आहे. यामुळे या प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंत कमी झाली आहे.
३. प्रोत्साहनपर लाभाच्या वर्षात बदल..!योजनेच्या मूळ नियमावलीतील प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबतच्या निकषांमधून सन २०२६-२७’ हे वर्ष आता वगळण्यात आले आहे..!
महात्मा फुले योजनेचे (२०१९) लाभार्थीपूर्वी लाभ मिळाला असला तरी, ठराविक काळातील थकीत कर्जासाठी पुन्हा २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीस पात्र.कर्ज कालावधी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले पीक कर्ज.
कधीपर्यंत थकीत असावे?
३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न भरलेले कर्ज. कमाल कर्जमाफी मर्यादा मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त ₹२ लाख..!
अधिकृत परिपत्रक कोठे पाहावे?
सहकार विभागाने जारी केलेले हे शासन पूरकपत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आले असून ते महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परिपत्रकाचा संगणक सांकेतांक (Code) २०२६०७१५१९०३४१४८४७ असा आहे..!
या सुधारित निर्णयामुळे राज्यातील अनेक अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, कर्जमुक्त होऊन पुन्हा जोमाने शेती करण्यासाठी बळ मिळणार आहे..!
