​🚩 संत सोपानकाका पालखी सोहळा 🌏 निरा-बारामती मार्गावरील वाहतुकीत बदल,’हे असणार पर्यायी मार्ग..!

0
IMG-20250707-WA0076
Spread the love

​वडगाव निंबाळकर | वार्ताहर
श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा २०२६ चे बारामती तालुक्यात आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी मोटार वाहन कायद्यानुसार हे आदेश जारी केले आहेत..!

​पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळणे, संभाव्य अपघात रोखणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि (API) जीवन मोहिते यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे..!

​बारामती तालुक्यात दि. १४ जुलै २०२६ ते १६ जुलै २०२६ या कालावधीत पालखीचा मुक्काम व प्रवास असणार आहे. या काळात वाहतूक खालीलप्रमाणे वळवण्यात आली आहे:
​ असे असतील वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग:
​१) दि. १४/०७/२०२६ व दि. १५/०७/२०२६ रोजी:
​बंद राहणारा मार्ग: निरा कॉर्नर ते निंबुत दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
​पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहतूक मोरगाव रोड ➡️ चौधरवाडी फाटा ➡️ चौधरवाडी – करंजेपूल या पर्यायी मार्गाने पुढे पाठवली जाईल.
​२) दि. १६/०७/२०२६ रोजी:
​बंद राहणारा मार्ग: निरा–बारामती रोडवरील थेट वाहतूक बंद राहील.
​पर्यायी मार्ग: या दिवशी वाहतूक कठिणपूल ➡️ बजरंगवाडी ➡️ कोऱ्हाळे खुर्द ➡️ होळ ➡️ वाणेवाडी ➡️ करंजेपूल ➡️ निरा अशा पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे..!

​”पालखी सोहळा अत्यंत शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व वाहनचालकांनी आणि नागरिकांनी या वाहतूक बदलांची नोंद घ्यावी. रस्त्यावरील वाहतूक पोलीस व बंदोबस्तावरील अधिकारी/अंमलदार यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.”
— जीवन मोहिते, प्रभारी अधिकारी (API), वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed