छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाल सवंगडी अन् साल्हेर योद्धा सरदार सूर्याजी काकडे यांच्यावरील कविता..!
॥ शिवरायांचा कर्ण – वीर सूर्याजी काकडे ॥
स्वराज्याच्या इतिहासाचे,
सोनेरी ते पान,
ज्यांनी राखला नेहमी,
भगव्याचा उंच मान..!
कर्तव्याला मानून जागृत,
लढले जे रात्रं-दिन,
अशा सूर्याजींच्या चरणी,
हे मस्तक आहे लीन..!
शत्रूला कापून काढायला,
हात त्यांचे सरसावले,
पण गरिबांना द्यायला,
दातृत्वाचे झरे वाहिले..!
राजे बोलले शेवटी,
सूर्याजीला ‘कर्ण’ दिली उपाधी,
अशा शूर दानशूराची,
गाथा गाते ही सह्याद्री..!
रक्ताचे पाणी करून,
ज्यांनी स्वराज्य घडवले,
त्यांच्याच साक्षीने मग,
नगाडे वाजू लागले..!
अन् शिवराज्याभिषेक सोहळ्यात दिला,
तिसऱ्या पायरीचा मान..!
इतिहासाच्या पानात कोरले गेले,
काकडेंचे हे नाव महान..!
साल्हेरच्या युद्धात पडले,
जरी पराक्रमी ते रणझुंजार,
तरी आजही अमर आहे,
त्यांचा तो धारदार वार..!
शिवबाचे ते बालसखे,
स्वराज्याचे मावळे खास,
सूर्याजींच्या शौर्याचा,
महाराष्ट्राला राहील कायम अभिमान..!
