दारूच्या नशेत धुंद होऊन ट्रक चालवणाऱ्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल..!

0
1790230115072
Spread the love

बारामती वडगांव निं

दारूच्या नशेत वाहने चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गस्तीदरम्यान आणि वाहन तपासणीवेळी दारूच्या नशेत ट्रक चालवताना आढळलेल्या एका चालकाविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे..!

​मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त व वाहन तपासणी करत असताना आरोपी संतोष पांडूरंग पानगे (वय ४७, रा. कोऱ्हाळे बु., पानगेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे) हा टाटा कंपनीचा ट्रक (क्र. MH-42-B-7644) चालवताना आढळून आला. संशय आल्याने त्यास वाहनासह पोलीस ठाण्यात आणून ब्रीथ अनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याच्या शरीरात मद्याचे प्रमाण तब्बल १५८.२ mg/100 ml इतके धक्कादायक आढळून आले, जे नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे..!​

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८९/२०२६, मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पन्हाळे करत आहेत.​दरम्यान, मद्यपान करून वाहने चालवल्याने भीषण अपघात घडून निष्पाप नागरिकांचे प्राण धोक्यात येतात. त्यामुळे कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करावा, असे कडक आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed