पुरदंर तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.सुशील शंकर गायकवाड यांची निवड..!
saswad
पुरदंर तालुका नाभिक संघटनेची सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात श्री.आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे शनिवार दि.१९-०९-२०२६ रोजी पार पडली. जेष्ठ समन्वय सदस्य श्री.मनोज(मुन्नाशेठ) शिंदे,श्री.सतिश गायकवाड,श्री.नितीन राऊत सर पत्रकार दै.पुढारी श्री.डाॅ.मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत व संस्थापक अध्यक्ष पुरदंर तालुका नाभिक संघटना श्री.सुरेशजी साळुंके यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणुन श्री.सुशील शंकर गायकवाड पिंपरे खुर्द यांची निवड करण्यात आली तसेच बाकी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमासाठी तालुक्यातुन व जेजुरी,सासवड शहरातील समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमांचे नियोजन श्री.मनोज (मुन्ना) शिंदे व सासवड शहर नाभिक संघटनेने केले सुत्रसंचलन श्री.नितीन राऊत सर यांनी केले तर डाॅ.श्री.मनोज शिंदे यांनी आभार मानले.श्री.संदिप गायकवाड अध्यक्ष निरा, श्री.नंदकुमार काश्वेद,श्री.अजित गायकवाड,श्री.अमर झेंडे,श्री.आदिनाथ गायकवाड,श्री.पराग काटकर,श्री.गणेश खराडे,श्री.हेंमत काशिद उपस्थित होते.
