नेक्सा ग्रुप ऑफ कंपनीजच्या सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण भागातील बाल खेळाडूंना प्रोत्साहन..!

0
IMG-20260905-WA0000
Spread the love

सोमेश्वर नगर (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौधरवाडी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नेक्सा ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेशांचे (स्पोर्ट ड्रेस) वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी सुंदर व प्रभावी भाषणे सादर केली..!

यानंतर प्रमुख पाहुणे श्री. निलेश दिलीप गायकवाड (चेअरमन – नेक्सा ग्रुप ऑफ कंपनीज तथा अध्यक्ष – बारामती तालुका औद्योगिक सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची मोठी आवड व गुणवत्ता असते. त्यांना योग्य साधने व प्रोत्साहन मिळाल्यास ते क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतात..!

सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुलांच्या क्रीडा कौशल्याला सहकार्य करण्याचे काम नेक्सा ग्रुपने केले आहे.या कार्यक्रमास गावच्या विद्यमान उपसरपंच प्रमिला पवार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी भापकर, माजी सरपंच संदीप (भैया) चौधरी, नेक्सा ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापक प्रसाद साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ, तसेच ग्रामस्थ योगेश चौधरी, पुनम चौधरी, सोनाली शिंदे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बालगुडे मॅडम व शारदा खामकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी शारदा खामकर मॅडम यांनी नेक्सा ग्रुप व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. आकर्षक नवीन गणवेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed