वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे सक्त पेट्रोलिंग

0
IMG-20260911-WA0010
Spread the love

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी म्हणून बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सक्त पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून आज मूर्ती येथील बाजारपेठ तसेच सोमेश्वर कारखाना परिसर येथे पोलीस पथकाकडून कसून गस्त घालण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान बाजारपेठेतील गजबजलेली ठिकाणे, दुकाने आणि नागरिकांची वर्दळ असणाऱ्या परिसराची कसून पाहणी करण्यात आली. नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे, तसेच चोरी, पाकीटमारी व इतर अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष दक्षता बाळगली जात आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची स्वतः काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने अशा प्रकारची नियमित गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजना यापुढेही अविरत सुरू राहणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed