तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; ‘तिसऱ्या आघाडी’च्या एन्ट्रीने राजकीय समीकरणे बदलणार..?

0
1784200622517
Spread the love

पुणे
ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच वाढू लागला आहे. या निवडणुकीत आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने दोन आघाड्यांमध्ये होणारी सरळ लढत आता थेट तिरंगी किंवा बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. कारण, या राजकीय आखाड्यात आता ‘तिसऱ्या आघाडी’ने धमाकेदार एन्ट्री केली आहे. या तिसऱ्या आघाडीच्या प्रवेशामुळे संपूर्ण तालुक्याच्या गावागावांतील जुनी राजकीय गणिते आणि विजयाची समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे..!

अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या अवस्थेत पोहोचलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत तिसऱ्या आघाडीने अत्यंत रणनीतिक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आघाडीकडून केवळ नावापुरते उमेदवार न देता, सरपंच पदाच्या दावेदारासह सर्वच प्रभागांतील सदस्यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वजनदार यादी तयार करण्यात आली आहे.
उमेदवारांची निवड करताना त्यांचा जनसंपर्क, अभ्यास आणि गावाची समज या गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीच्या या भूमिकेमुळे काही गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे..!

या नव्या राजकीय समीकरणावर प्रथमच निवडल्या जाणाऱ्या जनतेतून सरपंच पदाला मतदार राजा कसा प्रतिसाद देतोय हेही तितकंच खरं आहे. यामुळे गावातील नागरिकांना मतदानासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. जनतेला योग्य आणि कार्यक्षम उमेदवार निवडून देण्याची संधी या आघाडीमुळे मिळणार आहे अशा चर्चा गावात, चौका – चौकात पाहायला मिळतात..!

‘निष्ठेची विष्टा’ आणि बदलतं राजकारण..!
सध्या संपूर्ण देशासह राज्याच्या राजकारणात ‘निष्ठेची विष्टा’ झाल्याचे,ग्रामीण भागातील गावगाड्यावर याचा परिणाम होणार का? आणि नक्की तो किती होणार,हे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे ठणार आहे. येणाऱ्या काही दिवसांतच कोण कोणासोबत जाणार आणि कोणाची युती कोणाशी होणार, याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल..!

**सामान्य मतदारांची आर्त हाक** – या सगळ्या राजकीय उलथापालथीत नेहमीप्रमाणे गावातील सर्वसामान्य मतदार मात्र केंद्रस्थानी आला आहे. गावोगावच्या राजकारणात आणि निवडणुकांच्या ईर्षेमध्ये नेहमी भरडला जातो तो केवळ आणि केवळ सर्वसामान्य माणूस!
निवडणुका येतात आणि जातात, मात्र त्यातून निर्माण होणारे हेवेदावे आणि कटुता गावातील शांतता भंग करते. म्हणूनच, निवडणुका कोणत्याही थराला जावोत, पण आमच्या गावाचं पारंपरिक ‘गावपण’ आणि आपुलकी हरवू नये,अशी माफक आणि भावनिक अपेक्षा तालुक्यातील सामान्य मतदारांकडून व्यक्त केली जात आहे..!
सध्या तरी तालुक्यातील या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, लवकरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. या त्रिकोणी लढतीत बाजी कोण मारणार, तिसऱ्या आघाडीचा फायदा नक्की कोणाला होणार कि तिसरी आघाडी बाजी मारणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed