बारामती: निंबुत ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय लोकसंख्या आणि आरक्षण प्रारूप जाहीर; एकूण १५ सदस्यांमध्ये ८ महिलांना संधी..!
बारामती (विशेष प्रतिनिधी):
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्वाक्षरीने बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय लोकसंख्या आणि आरक्षणाचे अधिकृत प्रारूप (नमुना ‘अ’ अनुसूची) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या नवीन रचनेनुसार निंबुत ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५ प्रभाग असून, एकूण सदस्य संख्या १५ असणार आहे. विशेष म्हणजे, या १५ जागांपैकी तब्बल ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून महिलांना बहुमताचे प्रतिनिधित्व मिळणार आहे..!
लोकसंख्येची प्रभागनिहाय आकडेवारी
लगतच्या जनगणनेनुसार निंबुत ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या ६,०५२ इतकी असून, यामध्ये अनुसूचित जातीची (SC) लोकसंख्या ६५९ आणि अनुसूचित जमातीची (ST) लोकसंख्या ३४१ इतकी नोंदवली गेली आहे..!
प्रभाग क्र. १: एकूण लोकसंख्या १,३१६ (अनुसूचित जाती: ५९७, अनुसूचित जमाती: ०)
प्रभाग क्र. २: एकूण लोकसंख्या १,३११ (अनुसूचित जाती: २०, अनुसूचित जमाती: ०
प्रभाग क्र. ३: एकूण लोकसंख्या १,१७३ (अनुसूचित जाती: २२, अनुसूचित जमाती: १०)
प्रभाग क्र. ४: एकूण लोकसंख्या १,१४५ (अनुसूचित जाती: १३, अनुसूचित जमाती: २९२)
प्रभाग क्र. ५: एकूण लोकसंख्या १,१०७ (अनुसूचित जाती: २७, अनुसूचित जमाती: १९)
आरक्षणाचे संपूर्ण गणित (एकूण जागा: १५)
शासकीय नियमांनुसार प्रभागांमधील जागांचे आणि महिला आरक्षणाचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे..! यावेळच्या आरक्षण रचनेत महिला उमेदवारांना मोठे प्राधान्य मिळाले आहे..!
एकूण १५ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव आहेत, त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
अनुसूचित जाती (स्त्री): १ जागा (प्रभाग १)
अनुसूचित जमाती (स्त्री): ०
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री): ३ जागा (प्रभाग २, ३ आणि ५ मध्ये प्रत्येकी १)
सर्वसाधारण (स्त्री) : ४ जागा (प्रभाग १, ३, ४ आणि ५ मध्ये प्रत्येकी १)
निंबुत ग्रामपंचायतीच्या या नवीन प्रभाग रचनेमुळे गावच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळणार आहे.
एकूण ५ प्रभागांपैकी प्रभाग १, प्रभाग ३ आणि प्रभाग ५ मध्ये प्रत्येकी २ महिला सदस्य निवडून येणार असल्याने या प्रभागांमध्ये महिला राज पाहायला मिळेल, तर प्रभाग २ आणि प्रभाग ४ मध्ये प्रत्येकी १ महिला सदस्य असेल. या जाहीर प्रारूपामुळे आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे..!
