इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवून महिलेला ब्लॅकमेल करणारा जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल..!

0
Screenshot_20250427-220436.Google
Spread the love

वडगांव निंबाळकर
सोशल मीडियाचा गैरवापर करून एका महिलेचा फेक इन्स्टाग्राम आयडी बनवून, तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी करंजे (ता. बारामती) येथील संशयित आरोपी दिपक मधूकर दुबळे याच्याविरुद्ध पोक्सो आणि आयटी ॲक्टसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे..!

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक दुबळे याने एप्रिल २०२६ पासून ते ३ जुलै २०२६ दरम्यान मौजे करंजे गावच्या हद्दीत हे कृत्य केले. आरोपीने इन्स्टाग्रामवर पीडितेच्या नावाने एक बनावट (Fake) अकाउंट तयार केले. त्यानंतर त्याने पीडितेच्या मोबाईलवर तिचे काही उघडे व अश्लील फोटो पाठवले. “जर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचे नसतील, तर माझ्याशी नग्न होऊन व्हिडिओ कॉलवर बोल,” अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली..!

आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये जतन (Save) करून ठेवले. एवढ्यावरच न थांबता, त्याने हे फोटो पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना पाठवून तिची समाजात मोठी बदनामी केली आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली..!

पीडितेच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९, ७७, ७८, २९५ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायदा कलम १२, १४, १५ आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा कलम ६७(A), ६७(B), ६६(C), ६६(D) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार हे करत असून, गुन्ह्याचा प्राथमिक रिपोर्ट बारामती येथील विशेष न्यायालयात पाठवण्यात आला आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed