१९९७ चा इतिहास सांगत विद्यार्थी आणि CJP चा मा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा..!

0
FB_IMG_1785046100345
Spread the love

वृत्तसेवा

आज देशातील पेपरफुटीच्या घटनांनंतर पेटलेल्या आंदोलनांवरून. मा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान विरोधक आणि विद्यार्थी संघटनांच्या निशाण्यावर आले आहेत. मात्र, या संपूर्ण वादाला एक महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. **आजपासून सुमारे ३० वर्षांपूर्वी**, म्हणजे १९९७ मध्ये ओडिशामध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हाही अशाच प्रकारची पेपरफुटीची घटना घडली होती. विशेष म्हणजे, त्या वेळी या पेपरफुटीविरोधात पेटलेल्या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी केले होते..!

आज ज्या खुर्चीवर बसून धर्मेंद्र प्रधान यांना विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्रोशाला सामोरे जावे लागत होते, एकेकाळी त्याच भूमिकेत ते स्वतः रस्त्यावर उतरून तत्कालीन सरकारविरोधात ते लढा देत होते.

१९९७ चे ते ऐतिहासिक आंदोलन: काय घडले होते..?

१९९७ मध्ये ओडिशामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्या काळात राज्यभरात एका मोठ्या परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजले. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) बॅनरखाली विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलन पुकारले होते.( परंतु त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, होते फक्त दूरदर्शन शहरी भागात केबल ठरविक news channel आणि वृत्तपत्रे )

धर्मेंद्र प्रधान यांचा पुढाकार: तत्कालीन तरुण विद्यार्थी नेते आणि ‘अभाविप’चे खंबीर कार्यकर्ते म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते . या आंदोलनात राज्यभरातून सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला. आंदोलक विद्यार्थ्यांवर निर्दयीपणे लाठीमार करण्यात आला. या लाठीहल्ल्यात धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लढा देताना त्यांनी स्वतः पोलिसांच्या लाठ्या झेलल्या होत्या..!

३० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती, पण भूमिका बदलल्या?

आज सुमारे तीन दशकांनंतर पुन्हा एकदा NEET, NET यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांच्या पेपरफुटी आणि अनियमिततेमुळे देशातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते . देशभरात ठिकठिकाणी निदर्शने होत होती . मात्र, या वेळी परिस्थिती बदलली आहे.कालचे आंदोलक विद्यार्थी नेते धर्मेंद्र प्रधान आज देशाचे मा ‘केंद्रीय शिक्षण मंत्री’ होते , तर ज्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ते लढले होते, आज तोच विद्यार्थी वर्ग त्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत होता..!

काही ठिकाणी निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.या ऐतिहासिक संदर्भाचा हवाला देत CJP आणि विविध विद्यार्थी संघटनांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता आणि त्यामुळे अखेर काल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या आंदोलना दरम्यान विध्यार्थी यांनी त्याच्याकडची अपेक्षित संवेदनशीलता कुठे गेली असा प्रश्न उपस्थित करणे स्वाभाविक होते ..?

“ज्या नेत्याने स्वतः पेपरफुटीविरोधात लाठ्या खाल्ल्या, ज्याला विद्यार्थ्यांच्या वेदना आणि संघर्षाची जाणीव असायला हवी होती, त्याच नेत्याच्या काळात आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लाठ्या खाव्या लागत होत्या ,” असा सवाल उपस्थित केला जात होता. Cjp च्या नेत्यांच्या मते, “१९९७ मध्ये जानकी वल्लभ पटनायक यांच्या सरकारने जे केले, तेच आज घडत असेल, तर मग तेव्हाच्या आणि आताच्या सरकारमध्ये फरक काय? ज्या धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः अन्याय सहन केला, त्यांच्याकडून आजच्या विद्यार्थ्यांना संवेदनशीलता आणि न्यायाची अपेक्षा होती, लाठीचार्ज किंवा दुर्लक्षाची नाही.!.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed