मतदार यादीच्या ‘शुद्धीकरणा’नंतरच वाजणार गावगाड्याचे रणशिंग..!महाराष्ट्रात ७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार; वॉर्ड रचना-आरक्षण जाहीर झालेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली..!

0
IMG_20260217_194754
Spread the love

विशेष प्रतिनिधी:राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग आता थेट आगामी ‘ऑक्टोबर’ महिन्याकडे वळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली आहे. या देशव्यापी मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात ३० जूनपासून प्रत्यक्ष गृहभेटींच्या सत्राला सुरुवात झाली असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या अतिमहत्त्वाच्या यादी शुद्धीकरणानंतरच राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायत निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे..!

🏡 राज्यभरात घरोघरी सर्वेक्षण: ३.९४ लाख अधिकारी मैदानातनिवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, चालू असलेल्या ‘जनगणना घरसूची’ प्रक्रियेसोबत एकसमान कार्यप्रणाली राखण्यासाठी या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या महामोहिमेत देशभरातील ३६.७३ कोटी मतदारांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी ३.९४ लाख बूथस्तरीय अधिकारी (BLO) मैदानात उतरले असून, त्यांना मदत करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले ३.४२ लाख बूथ एजंट (BLA) देखील कार्यरत राहणार आहेत.

📅 असे असेल महाराष्ट्रातील ‘SIR’ मोहिमेचे वेळापत्रक:३० जून ते २९ जुलै: बीएलओ (BLO) अधिकारी नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार.५ ऑगस्ट २०२६: प्रारुप (कच्ची) मतदार यादी जाहीर केली जाईल.५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: नागरिकांना नावांमधील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा नवीन नाव नोंदणीसाठी दावे आणि हरकती सादर करता येतील.७ ऑक्टोबर २०२६: दुरुस्त्यांसह महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. आयोगाच्या या नवीन वेळापत्रकामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे..!

नागरिकांनो सावधान! ‘३ वेळा संधी, अन्यथा नाव कट’या मोहिमेदरम्यान जर एखादा नागरिक सलग तीन वेळा घरात भेटला नाही, किंवा त्याने आवश्यक फॉर्म भरून दिला नाही, तर त्याचे नाव थेट मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या घराजवळ येणाऱ्या ‘बीएलओ’ अधिकाऱ्यांना योग्य ती कागदपत्रे दाखवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed