अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून विनयभंग; सदोबाची वाडीच्या तरुणाला वडगाव निंबाळकर पोलिसांकडून अटक..!
वडगाव निंबाळकर:
पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तनगर, चिलाईमाता मंदिर रोड परिसरात दोन अल्पवयीन मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे..!
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुख्य आरोपी आर्यन सचिन माने (रा. निरगुडवाडी सदोबाचीवाडी, ता. बारामती) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी ही घटना घडली. आरोपी आर्यन माने आणि त्याच्या साथीदाराने चिलाईमाता मंदिर रोड परिसरात अल्पवयीन मुलींचा दुचाकीवरून पाठलाग केला व त्यांचा विनयभंग केला..!
याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५, ७८, ३(५) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो – POCSO) अधिनियम कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे..!
पोलिसांनी मुख्य आरोपी आर्यन माने याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत. या घटनेतील दुसऱ्या फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत..!
