​विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ? काकडे महाविद्यालय परिसरात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजूर; ५,५०० हून अधिक जणांना दिलासा..!

0
Screenshot_20260713_100528_Google
Spread the love

सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या भागात “आपले सरकार सेवा केंद्र” (सेतू केंद्र) मंजूर करण्यात आले आहे..!

या एकाच केंद्राच्या माध्यमातून परिसरातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना सर्व शासकीय दाखले आणि ऑनलाईन सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.​खाजगी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज नाही​सध्या सोमेश्वरनगर परिसरात असलेले केंद्र अपुरे पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच समस्या ओळखून काकडे महाविद्यालयाने या नवीन केंद्रासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे..!​

या निर्णयाबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले:​”नवीन सेतू केंद्रामुळे विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरण्यासाठी किंवा दाखल्यांसाठी खाजगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागणार नाही. हे केंद्र तज्ज्ञ व्यक्तींमार्फत चालवले जाईल. विशेष म्हणजे, या केंद्राच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनीही या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..!

“​या नवीन सेतू केंद्रामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचीही शासकीय कामांसाठी होणारी वणवण थांबणार आहे..!या केंद्रात खालील सेवा पुरवल्या जातील- प्रवेश प्रक्रिया फॉर्म, शिष्यवृत्ती (Scholarship) अर्ज,उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र (Caste Certificate), आणि रहिवासी दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड आणि विविध सरकारी योजनांचे फॉर्म,शेतकऱ्यांशी संबंधित विविध शासकीय योजनांचे लाभ आणि अर्ज प्रक्रिया..!​

थोडक्यात सांगायचे तर…

काकडे महाविद्यालय परिसरात सुरू होणाऱ्या या केंद्रामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, शैक्षणिक कामांना कमालीची गती मिळणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed