१६ जुलै,वाढदिवस अभिजितभैय्या काकडे यांचा…!!!
सहसंपादक गणेश फरांदे
निंबुत
श्री सतीश भैय्या काकडे देशमुख,, संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला परिचित असलेले एक विश्वासू नाव… गेल्या वीस वर्षापासून शेतकरी संघटनेचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना या परिवाराशी माझी जवळीक आली ,, याच परिवारातील आदरणीय श्री अभिजीत भैया काकडे देशमुख यांचा उद्या १६ जुलै जन्मदिवस ,,
समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना सामान्यतील सामान्य व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू समजून नेहमीच न्याय देण्याची भूमिका कायम ठेवणारे आदरणीय अभिजीत भैया..
गेल्या दोन-तीन वर्षापासून त्यांच्याशी अतिशय चांगली मैत्री झाल्यामुळे त्यांना जवळून ओळखता आले..
लांबून रागीट, शिस्तप्रिय, अतिशय कडक स्वभावाचे वाटणारे अभिजीत भैय्या, अतिशय संवेदनशील आहेत हे मला तेव्हा समजले.. गोरगरीब जनतेबद्दल असणारा कळवळा,, आपले निंबुत गावावर असणारे प्रेम,, शेतकऱ्यांबद्दल असणारी आस्था,,स्पष्टवक्तेपणा, आणि विशेषतः मित्रांसाठी नेहमी धावणारे,मित्राना वेळ देणारे भैय्या,,,
मु सा काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथील समितीवर अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका ठेवत त्यांना फी मध्ये विशेष सवलत व कित्येक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा ,काकडे परिवाराचा वारसा पुढे चालवणारे ,अभिजीतभैय्या ..
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून काम करत असताना शेतकरी ,कामगार आणि सभासदांच्या हितासाठी नेहमी तत्पर असणारे अभिजीत भैया,,
एखादे विकासकाम डोक्यात घेतले की ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून निंबुत आणि संपूर्ण परिसर त्यांच्याकडे बघतो…
अशा एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाला आमच्या संपूर्ण मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎂🎂🎂🎂🎂🎂
