AI व्हॉइस असिस्टंट आणि दमदार फीचर्ससह ‘Hyundai Bayon’ बारामतीत दणक्यात लाँच..!
सोमाणी ह्युंदाई येथे नवीन कारचे दिमाखदार अनावरण, बारामतीचे मा नगराध्यक्ष सुभाष शेठ सोमाणी आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेटी यांची प्रमुख उपस्थिती..!
बारामती – दिनांक २७ ऑक्टोबर २०२६
बारामतीकरांच्या वाहनप्रेमात भर घालण्यासाठी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा ट्रेंड सेट करण्यासाठी ‘सोमाणी ह्युंदाई’ बारामती येथे नवीन ‘Hyundai Bayon’ या अत्याधुनिक कारचे दिमाखदार अनावरण मोठ्या उत्साहात आणि सोहळ्यात पार पडले. बारामतीचे मा. नगराध्यक्ष श्री. सुभाष शेठ सोमाणी, बारामती शहर पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेटी आणि सोमाणी उद्योग समूहाचे MD केतन सोमाणी यांच्या शुभहस्ते या नव्याकोरी कारचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला बारामती परिसरातील बँक व फायनान्स क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी, हुंडाई परिवाराचे व्यवस्थापन, अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी नवीन Hyundai Bayon चे अनावरण करून सोमाणी ह्युंदाई परिवाराला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या..!
आधुनिक डिझाइन, आकर्षक लूक, प्रगत तंत्रज्ञान आणि आरामदायी प्रवासाची वैशिष्ट्ये असलेल्या या गाडीची आरंभीची किंमत फक्त ₹९,९९,९००/- इतकी आहे. नवीन Hyundai Bayon मध्ये आकर्षक एसयूव्ही (SUV) डिझाइन, प्रशस्त इंटिरियर आणि दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त अशा आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या गाडीत १.५-लिटर पेट्रोल इंजिन असून ते ११५ PS पर्यंतची कमाल शक्ती निर्माण करते. ग्राहकांच्या पसंतीनुसार मॅन्युअल आणि iVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, Bose प्रीमियम साउंड सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारख्या लक्झरी सुविधा निवडक व्हेरिएंटनुसार मिळणार आहेत..!

या नवीन Hyundai Bayon चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील Generative AI Voice Assistant हे तंत्रज्ञान होय. सोमाणी ह्युंदाईचे सेल्स ग्रुप हेड श्री. अमोल जाधव सर यांनी माहिती देताना सांगितले की, “Perplexity आणि SoundHound AI यांच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली चालकाला नैसर्गिक भाषेत संवाद साधण्याची सुविधा देते. याद्वारे प्रवासाचे नियोजन, हवामानाची माहिती, हॉटेल्स-रेस्टॉरंट्स शोधणे, तसेच बातम्या आणि क्रीडा विषयक घडामोडींची माहिती झटपट मिळवणे सोपे होणार आहे..!”
सोमाणी ह्युंदाई, बारामती हे नेहमीच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा, दर्जेदार वाहनांचा अनुभव आणि विश्वासार्ह विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून, या नवीन Hyundai Bayon च्या लाँचिंगमुळे बारामतीमधील वाहनप्रेमींना ह्युंदाईच्या या नव्या आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला..!
