हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांना अटक,थेट येरवडा कारागृहात रवानगी..!

0
IMG-20260929-WA0062
Spread the love

बारामती

वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत कोमल प्रमोद नवले व जयश्री प्रकाश नवले (दोन्ही ता. बारामती, जि. पुणे) या महिलांना अटक करून त्यांची थेट येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे..!

​मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलिसांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३१/२०२६ नुसार ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १२३ आणि ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम’ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..!

​सदर धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत तपासी अंमलदार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस शिपाई निलेश जाधव, नागनाथ परगे, आरती तोडेकर आणि विकास येटाळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed