१५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात जुने रेशनकार्ड बंद होणार, त्याएवजी स्मार्ट कार्ड होणार लागू..!

0
Screenshot_20260804_182643_Google
Spread the love

महाराष्ट्रात रेशनिंग प्रणालीमध्ये मोठा बदल करण्यात येत असून, आगामी १५ ऑगस्टपासून राज्यातील कागदी रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने बंद करून त्याएवजी ‘स्मार्ट रेशनकार्ड’ वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमधून होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली जाईल..!

नवीन स्मार्ट रेशनकार्डवर क्युआर कोड असणार आहे, जो आधार कार्डशी जोडला जाईल.रेशन घेतल्यावर त्याची सविस्तर माहिती लाभार्थ्याला त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळेल.अंगठ्याच्या छापासोबतच चेहरा पडताळणीची सुविधा वापरली जाणार असल्यामुळे बनावट रेशनकार्ड, बोगस लाभार्थी आणि रेशन वितरनातील गैरप्रकारांना आळा बसेल..!

स्मार्ट रेशनकार्डच्या पहिल्या टप्प्यात पात्र पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना हे नवीन कार्ड दिले जाणार आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed