भारतीय रस्त्यांवर ३० वर्षांचा शानदार प्रवास करत नुकताच ह्युंडाई इंडियाने रचला नवा इतिहास..!
बारामती
भारतीय ऑटोमोबाईल विश्वात एक नवा मैलाचा दगड पार करत ह्युंडाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) भारतात आपली ३० वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. तीन दशकांची ही वाटचाल केवळ गाड्यांच्या विक्रीची कहाणी नाही, तर दूरदृष्टी,अप्रतिम कोरियन दर्जाची गुणवत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि भारतीय ग्राहकांच्या विश्वासाचा विजय आहे..!
सँट्रो ने झालेली सुरुवात, आज SUV सेगमेंटचा किंग म्हणून ओळख निर्माण केल्याचे पहावयास आपल्याला मिळते. ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा ह्युंडाईने भारतीय बाजारात प्रवेश केला, तेव्हा आपल्या आयकॉनिक Santro या हॅचबॅक कारद्वारे ‘टॉल-बॉय’ डिझाइनची ह्युंदाई ने ओळख करून दिली तसेच Accent गाडीला ही भारतीयांनी चांगला प्रतिसाद दिला. या कारने प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या हृदयात स्थान मिळवले. त्यानंतर कंपनीने कधीही मागे वळून पाहिले नाही..!
भारतीय बाजारपेठमंध्ये ह्युंदाई ने आयकॉनिक गाड्या आणल्या,यामध्ये i10, i20, Eon,Accent,वरणा, Elantra पासून ते Creta,Venue, EXTER आणि Tuscon सारख्या गाड्यांनी आपापल्या सेगमेंटमध्ये नवीन मानक प्रस्थापित केले आहेत..!
SUV सेगमेंटवर वर्चस्व कायमच वर्चस्व ठेवत ह्युंडाई क्रेटा (Creta) आजही भारतातील सर्वाधिक पसंतीची SUV ठरत आहे, ज्याने देशात प्रीमियम फीचर्स असलेल्या गाड्यांची नवी लाट आणली..!इंजिन आणि तंत्रज्ञानात अव्वल राहून पेट्रोल, डिझेल आणि EV चा मेळ घालत,ह्युंडाईची सर्वात मोठी ताकद त्यांचे इंजिनिअरिंग व्हिजन राहिले आहे. भारतीय ग्राहकांची गरज ओळखून कंपनीने असे पेट्रोल आणि डिझेल इंजिन तयार केले, जे अत्यंत पॉवरफुल असण्यासोबतच मायलेज आणि रिफाइनमेंट बाबतीतही सर्वोत्तम मानले जातात..!
पॉवरफुल इंजिन आणि ड्रायव्हिंग अनुभव व CRDi डिझेल इंजिनची स्मूथनेस आणि Turbo-GDi पेट्रोल इंजिनच्या परफॉर्मन्सने ड्रायव्हिंगचा आनंद एका वेगळ्याच पातळीवर नेला..!
भविष्याची दूरदृष्टी ठेऊन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (iMT, DCT, AT) पासून ते आधुनिक फीचर्स (जसे की ADAS सेफ्टी आणि Bluelink कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी) सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात ह्युंडाई नेहमी पुढे राहिली आहे. यासोबतच IONIQ 5 सारख्या इलेक्ट्रिक कार्सद्वारे कंपनी आता ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे..!
गुणवत्ता आणि व्हिजन याबरोबर ‘मेड इन इंडिया’चा जागतिक अभिमान साधत ह्युंडाईने केवळ भारतात गाड्या विकल्या नाहीत, तर तमिळनाडू येथील आपल्या अत्याधुनिक प्लांटद्वारे भारताला एक ग्लोबल एक्स्पोर्ट हब बनवले आहे ..!गुणवत्ता आणि विश्वास यांच्या ह्युंडाईच्या यशाचा मूळ मंत्र त्यांची दूरदृष्टी आणि प्रत्येक गाडीत दिली जाणारी प्रीमियम दर्जाची गुणवत्ता आहे. ३० वर्षांत ह्युंडाईने दाखवून दिले आहे की सुरक्षा, लक्झरी आणि परवडणारी किंमत यांचा योग्य समतोल कसा साधायचा HIML ने दाखवून दिले..!
३० वर्षांच्या या ऐतिहासिक टप्प्यावर उभे राहून, ह्युंडाई इंडिया आता इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EVs), सस्टेनेबल तंत्रज्ञान आणि नेक्स्ट-जनरेशन मोबिलिटीवर भर देत आहे. भारतीय रस्त्यांवरील ३० वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ एक सुरुवात आहे, आणि ह्युंडाईचे हे ड्रायव्हिंग व्हिजन येणाऱ्या दशकांमध्येही देशाला नवी गती देत राहील..!
