बारामतीचे शिल्पकार, लोकनेते अजितदादा पवार स्मारक..! “विकासाचा महामेरू, जनमाणसांचे दादा”

0
1000269629
Spread the love

बारामती

बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वर्गीय लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या ३.५ एकर जागेतील भव्य स्मारकास आणि ५० मीटर उंच विकास मनोऱ्याच्या (Tower) प्रस्तावास एकमताने मंजुरी.५० मीटर उंच भव्य टॉवर, तीन मजली अत्याधुनिक म्युझियम, जनता दरबाराची हुबेहूब प्रतिकृती आणि दृकश्राव्य जीवनपट ..!

बारामतीचा कायापालट करणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ अजितदादा (Ajit Pawar) यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बारामतीमध्ये एक अतिशय भव्य आणि देखणे स्मारक आकारास येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३.५ एकरची विस्तीर्ण जागा निश्चित करण्यात आली असून, या स्मारकाचे मुख्य आकर्षण असणार आहे ५० फूट उंच देखणा मनोरा (Tower)! हा मनोरा बारामतीच्या विकासाची आणि दादांच्या उंच भरारीची साक्ष देणारा ठरणार आहे..!
स्मारकाचे भव्य स्वरूप आणि वैशिष्ट्ये:३.५ एकरचा विस्तीर्ण परिसर: स्मारक आणि डिजिटल गॅलरी: दादांनी बारामती आणि महाराष्ट्रासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, विकासकामे आणि त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती देणारे दालन.

हे स्मारक बारामतीचे नवीन प्रमुख पर्यटन स्थळ आणि भावी पिढीसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरेल.हा भव्य प्रकल्प म्हणजे बारामतीकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला दिलेली एक अनोखी आणि ऐतिहासिक आदरांजली असणार आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed