बारामती विमानतळ होणार हायटेक आणि सुरक्षित – ७० कोटींचा प्रस्ताव मंजूर,धावपट्टीपासून रात्रीच्या प्रकाशयोजनेपर्यंत होणार मोठी कामे..!
बारामती प्रतिनिधी
बारामती विमानतळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बारामती विमानतळ अधिक हायटेक आणि सुरक्षित बनवण्यासाठी ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याअंतर्गत विमानतळावर मोठ्या प्रमाणावर विकासकाम्मे केली जाणार आहेत..!
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामती विमानतळाच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार असून विमान वाहतूक अधिक सुलभ होईल. तसेच विस्तारित आणि बळकट धावपट्टी होणार आहे.विमानांच्या सुरक्षित लँडिंग आणि टेकऑफसाठी धावपट्टीच्या नूतनीकरणासह तिचा विस्तार केला जाणार आहे.आधुनिक प्रकाशयोजना (Night Landing Facility) सह रात्रीच्या वेळीही विमाने सुखरूप उतरता यावीत यासाठी अत्याधुनिक प्रकाशयोजना बसवण्यात येणार आहे. प्रवासी सुविधा आणि सुरक्षा यामध्ये वाढ होणार.प्रवाशांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा आणि विमानतळाची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली जाईल..!
या विकासकामांमुळे बारामती परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रातील दळणवळणाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..!
