श्री सोमेश्वर कारखान्याला व्याज द्यावे लागणे,ही भुषणावह बाब नसुन कमी पणाची बाब आहे.!! श्री सतिशभैया काकडे

0
Screenshot_20251209_181437

सोमेश्वरनगर,

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील ४ गाळप हंगामामध्ये FRP रक्कम वेळेवर नदिल्यामुळे कारखान्यास त्यावरील व्याज कृती समितीने वसुल केल्यानंतर कारखान्याने वर्तमान पत्रांमधुनसभासदांची दिशाभुल करण्यासाठी सोमेश्वर कारखाना FRP रक्कमेचे व्याज देणारा पहिलाच कारखाना आहेअसे वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये कारखान्याची प्रतिमा मलीन झाली आहे. कारण राज्यातील बहुतांशीकारखाने FRP एकरक्कमी देत असतात उलट FRP वरील व्याज अदा करून सभासदांच्या अंतिम भावावरचेअरमन जाणीव पुर्वक परिणाम करीत आहेत. तसेच वेळोवेळी व्याज दिले हे वार्षिक सर्वसाधारण सभेतकिंवा अहवालात नमुद का केले नाही ?

तरी खालील बाबी कृती समिती आपल्या समोर ठेवत आहे..!

१) सोमेश्वर ठरला FRP वर व्याज देणारा पहिला कारखाना, सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण

उत्तर :-FRP रक्कमेचे व्याज द्यावे लागणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. राहिला विषय सभासदांचा तरसभासदांच्या न्याय हक्कासाठी कृती समिती कोर्टामध्ये गेली त्यामुळे कारखान्याला नाईलाजास्तव व्याजाचीरक्कम द्यावीच लागली. सभासदांच्या बद्दल चेअरमन यांना एवढेच प्रेम होते तर कृती समितीने कोर्टात दादमागण्यापुर्वीच मागील तीन ते चार वर्षामध्ये FRP रक्कमे वरील व्याज का दिले नाही ? FRP एकरक्कमी कादिली नाही? याचे चेअरमन यांनी प्रथम उत्तर दिले पाहिजे. तसेच सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण हे फक्तकृती समितीमुळेच आहे.

२) शासनाच्या नियमानुसार सोमेश्वरकडुन FRP वरील व्याज जमा, सभासदांना प्रथमहप्त्यापोटी ३,३००/- रूपये प्रतिटन देण्याचा निर्णय…

उत्तर :- सोमेश्वर कारखान्याने सन २०२१ – २२ ते २०२४- २०२५ या गाळप हंगामांमध्ये राज्य शासनाच्याधोरणानुसार दोन टप्यांमध्ये FRP रक्कम सभासदांना दिलेली आहे. वास्तविक उस तुटल्यापासुन १४दिवसांमध्ये उसाची एकरक्कमी FRP देणे बंधनकारक असते. केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर१९६६ नुसार विलंबाने दिलेल्या FRP रक्कमेवर १५ टक्के व्याज द्यावे लागते. कारखान्याने १४दिवसांमध्ये उसाची एकरक्कमी FRP न दिल्याने व राज्य सरकारच्या परिपत्रकाची पळवाट शोधुनकारखान्याने दोन टप्यांमध्ये FRP रक्कम दिल्याने केंद्र सरकारच्या धोरणानुसारच आम्ही व्याजाची रक्कममागत असुन यासाठीच आम्ही मा. हायकोर्ट मुंबई येथे याचिका दाखल केलेली असुन त्याचा निर्णयलवकरच होवुन सभासदांना उर्वरित व्याज मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि सभासदांना प्रथमहप्त्यापोटी ३,३०० /- रूपये प्रतिटन देत आहोत अशी मोठी टिमकी वाजविण्याची गरज नाही कारण कीसोमेश्वर कारखान्याची FRP रक्कम ३२८५ /- रू. प्रती मे. टन देणे कारखान्यावर बंधनकारक असुन त्यातकारखान्याने फक्त १५/- रूपयांची वाढ करून दिलेली आहे. आपल्या कारखान्या शेजारील खाजगीसाखर कारखाना दत्त शुगर साखरवाडी या कारखान्याने देखील सभासदांना ३,३००/- रूपये प्रतिटनपहिली उचल दिलेली आहे. तसेच माळेगाव कारखान्याने FRP रक्कम ३२७५/- रू. प्रती मे.टन देणेअसताना २५/- रूपयांची वाढ करून ३,३००/- रूपये प्रतिटन पहिली उचल दिलेली आहे, कोल्हापुरजिल्ह्यामधील कारखान्यांनी ३५०० /- रू. ते ३६०० /- रू. प्रती मे.टन पहिली उचल देत आहेत.त्याचप्रमाणे छत्रपती व इंदापुर कारखाना आजारी असतानाही ३२०० /- रू. प्रती मे.टन पहिल्या उचली दिलेल्या आहेत. त्यांच्या तुलनेत सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असताना मग३३०० /- रू. प्रती मे. टनच पहिली उचल का ?

३) हंगाम सन २०२१-२२ मधील १ कोटी १० लाख रूपये, जानेवारी २०२३ मध्ये तसेच उर्वरितहंगाम २०२२ – २३ मधील २३ लाख ९० हजार रूपये, हंगाम २०२३ – २४ मधील ४० लाख ६८हजार रूपये व हंगाम २०२४ – २५ मधील ६४ लाख ५८ हजार अषी एकुण १ कोटी २९ लाखरूपये व्याज रक्कम २ डिसेंबर २०२५ रोजी सभासदांच्या बँक खात्यात जमा असे सांगितलेआहे.

उत्तर :- सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत जवळपास २ कोटी ३९ लाख रूपये सभासदांच्या बँकखात्यामध्ये राज्य शासनाच्या आदेशा नुसार व्याज आकारणी करून दिलेले आहे. मात्र FRP एकरकमी वाचतयाचिका दाखल केली होती त्यावर दि. १७ / ३ / २०२५ रोजी मा. हायकोर्ट साहेव यांनी राज्य सरकारने FRP रक्कम दोनहप्त्यात देण्याचा आदेश काढला होता तो रद्द करून केंद्र सरकारच्या कायदयानुसार FRP एकरक्कमी देणे बंधनकारक आहे.असा निकाल दिला आहे. त्यामुळे कारखान्याला कृती समितीच्या म्हणण्यानुसार अजुन अंदाजे तीन ते साडेतीनकोटी रूपये व्याजाची रक्कम सभासदांना द्यावीच लागणार आहे. शेतकरी कृती समितीने मा. हायकोर्ट मुंबईयेथे याबाबत याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी दि. ८ / १२ / २०२५ रोजी होती. परंतु सदरसुनावणी पुढे गेली असुन ती दि.१६/१ / २०२६ रोजी होणार असुन यावेळी अंतिम निकाल लागुन सभासदांनाउर्वरित व्याजाची रक्कम मिळेल अशी कृती समितीस खात्री आहे.

४) सन २०२१-२२ FRP पेक्षा प्रति मेटन २१८/- रू. जास्त, सन २०२२ – २३ मध्ये ४९९/- रू.प्रती मेटन जास्त, सन २०२३ – २४ मध्ये ६९७ /- रु. प्रती मेटन जास्त, सन २०२४ – २५ मध्ये२२६/- रू. प्रती मे. टन जास्त दिले.

सोमेश्वर कारखान्याची रिकव्हरी, उपपदार्थ व को-जन यांच्या उत्पन्नाच्या आधारे सभासदांना भाव बसतो.परंतु ३१ मार्चच्या शिल्लक साठ्याच्या साखर पोत्यांचे व उपपदार्थांचे मुल्यांकन चेअरमन हे जाणीव पर्वककमी करत असुन सभासदांना जादा भाव बसु नये हा त्यांचा उद्देश असतो. FRP रक्कमेपेक्षा जास्त रक्कमदिली हे चेअरमन यांचे दिशाभुल करणारे वक्तव्य आहे. वास्तविक सोमेश्वरने FRP पेक्षा जास्त दरदिला असा कांगावा चेअरमन करतात, मगसन २०१३-१४ २२५७ / – FRP दिलीसन २०१४-१५ २२५७ / – FRP दिलीसन २०१५-१६ २२२७ / – FRP दिलीत्यावेळी माळेगाव कारखान्याने २८०० /- रू. प्रती मे. टन दर दिला म्हणजे सोमेश्वर कारखान्यानेसभासदांना ५८३/- रू. प्रती मे. टन दर कमी दिला हे सभासद विसरणार नाहीत.

तसेच चेअरमन जाणीवपुर्वक शिल्लक साठ्यांची मुल्यांकणे कमी करून अंतिम दर कमी देत आलेले आहेत. त्याच शिल्लकसाठ्यांची विक्री पाहिली असता सुमारे २०० ते ३०० रू. अधिकचा दर सभासदांना त्या त्या वर्षी मिळालाअसता. त्यामुळे चेअरमन यांनी वक्तव्य करताना जबाबदारीने करावे अशी कृती समितीस अपेक्षा आहे.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed