पती पाठोपाठ पत्नीचीही पीएचडी..! पाहुणेवाडी ता. बारामतीच्या कन्या प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे यांची पीएच.डी. पदवी प्रदान

0
a25090a6-9ef2-4738-a4da-9aee3d2b192b
Spread the love

आष्टी, जि. बीड

येथील अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील

प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना “आत्मकथा लेखन की चुनौतियाँ और स्त्री प्रश्न ( दलित स्त्री आत्मकथाकारों के विशेष संदर्भ में )
” या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे यांनी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. मुळच्या बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीच्या असलेल्या प्रा. शुभांगी खुडे यांचे पती आणि सोमेश्वरनगर (ता. बारामती ) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. पोपट जाधव यांनाही मागील आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिंदी विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
एकाच आठवड्यात एकाच विषयात आणि एकाच संशोधन केंद्रात जाधव पती पत्नी यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याने या पती-पत्नीचे मित्र, नातेवाईक, सहकारी आणि समाजातील सर्व स्थरातील लोकांकडून अभिनंदन केले जात आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. नितीन गायकवाड (सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे, हिंदी विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे , मा. प्राचार्य, डॉ. सोपान निंबोरे, सचिव अतुलशेठ मेहेर, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed