ऑटोमोबाईल बाजारात’बॅज इंजिनिअरिंग’च्या जोरावर मारुती सुझुकी आणि टोयोटाची अनोखी रणनीती..!
प्रतिनिधी
भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या एका वेगळ्याच व्यावसायिक धोरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. गाड्यांचे डिझाईन, इंजिन आणि उत्पादन एकाच कारखान्यात होत असताना, फक्त ब्रँडचा लोगो आणि नावामध्ये बदल करून ग्राहकांसमोर पूर्णपणे दोन वेगवेगळे पर्याय ठेवले जात आहेत. ऑटोमोबाईल उद्योगात या तंत्राला ‘बॅज इंजिनिअरिंग’ असे म्हटले जाते..!
एकाच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये या धोरणाचा प्रभावी वापर केला जात आहे. गुजरात येथील मारुती सुझुकीचा हंसालपूर हा प्लांट भारतामधील सर्वात अत्याधुनिक आणि मॉडर्न ऑटोमोटिव्ह सुविधा मानला जातो, जिथे या गाड्या तयार होतात..!
या धोरणांतर्गत बाजारात आलेल्या प्रमुख गाड्या आणि त्यांचे परस्पर संबंध –
मारुती बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा मारुती बलेनो ही मूळ हॅचबॅक गाडी असून, अगदी तीच गाडी काही मोजक्या बदलांसह टोयोटा शोरूममध्ये ‘ग्लान्झा’ या नावाने विकली जाते.
ग्रँड विटारा आणि हायरायडर या एसयूव्ही गाड्यांनी बाजारात मोठी धूम केली असून यांचे मूळ तंत्रज्ञान मारुतीचे आहे.
टोयोटाने आपली लोकप्रिय एमपीव्ही ‘इनोवा हायक्रॉस’ मारुती सुझुकीला सुपूर्द केली, ज्यातून मारुतीची ‘इनव्हिक्टो’ ही गाडी जन्माला आली.
याशिवाय रुमियन – एर्टिगा आणि टायसर – फ्रॉँक्स यांसारख्या गाड्यांच्या माध्यमातूनही ही रणनीती राबवली जात आहे..!
उत्पादन आणि गुणवत्तेचे वास्तव व सत्यता अशी आहे.
1.हंसालपूर प्लांटमधील समान असेंबली लाइनवर, समान कामगार आणि समान गुणवत्ता निरीक्षकांच्या देखरेखीखाली या गाड्या तयार होतात.
2.कार पुढे गेल्यानंतर एका गाडीवर ‘बलेनो’चा स्टीकर लागतो, तर अवघ्या काही तासांनंतर त्याच लाइनवरून बाहेर पडणाऱ्या गाडीवर टोयोटा ‘ग्लान्झा’चा बॅज लागतो.
- विक्री करताना टोयोटाच्या शोरूममध्ये जापानी स्टँडर्ड्स आणि वेगळ्या ग्रिल व इंटिरियर थीमच्या नावाखाली ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात, परंतु, प्रत्यक्षात उत्पादन आणि स्टँडर्ड्स मारुतीचेच असतात..!
या प्रयोगावर तज्ज्ञांचे मत – बॅज इंजिनिअरिंगमुळे एका कंपनीची विक्री वाढण्यास मदत होते तर दुसरीकडे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार व ब्रँडच्या पसंतीनुसार पर्याय मिळतात. मात्र, दोन्ही गाड्यांचा आतील गाभा आणि डीएनए एकच असतो..!
तुम्हाला काय वाटते, गाड्या खरेदी करताना ग्राहकांनी केवळ ब्रँडचा लोगो पाहावा की गाड्यांच्या अंतर्गत तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यावे? फक्त लोगो साठी किंमत वाढवून देणे योग्य वाटते का ..?
