ग्रामपंचायत निवडणुका अंतिम टप्प्यात..! इच्छुक उमेदवारांची तयारी पुर्ण.

0
IMG_20260217_194754
Spread the love

सोमेश्वर

राज्यातील बहुपतिक्षित ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. प्रत्यक्षात २० फेब्रुवारी पासून प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे. शासकीय यंत्रणा गुगल अर्थ च्या मदतीने गावाचे नकाशे अंतिम करून २७ फेब्रुवारी पर्यंत प्रभाग निश्चित होणार आहेत असे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे..!

जानेवारी २६ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत वर नुकतेच प्रशासकीय नियुक्ती झाल्या असताना, निवडणुका लांबनीवर पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र प्रभाग रचना प्रक्रिया तीन टप्यात पार पडणार आहेत. २० फेब्रुवारी पर्यंत गाव नकाशे अंतिम झाल्यानंतर २७ फेब्रुवारी ला प्रत्यक्ष पाहणी करून २३ मार्च पर्यंत आयोग यास मान्यता देईल..!

७ एप्रिल सूचना प्रसिद्ध होईल,१३ एप्रिल पर्यंत त्यावर हरकती नोंदवता येतील तर त्यावर सुनावणी २१ एप्रिल ला होईल.२८ एप्रिल ला पडताळणी होऊन ४ मे ला प्रभाग रचना प्रसिद्ध होईल असे समजते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed